ETV Bharat / state

Protest In Maharashtra : शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांचे धोतर फेडणाऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेसकडून एक लाखाचे बक्षीस - राज्यपालांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन

राज्यपालांच्या शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावर राज्यात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करत राज्यपालांचा निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यासमोरच डुप्लिकेट राज्यपालांचे यांचे धोतर फेडून निषेध करण्यात आला ( NCP Aggressive On Governor Statement).

Protest In Maharashtra
राष्ट्रवादी काँग्रेस
author img

By

Published : Nov 21, 2022, 12:07 PM IST

Updated : Nov 21, 2022, 10:53 PM IST

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरचा वाद वाढतच आहे. राज्यपालांच्या शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावर राज्यात सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. ठिकठिकाणी आंदोलन करत राज्यपालांचा निषेध करण्यात आला. यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आक्रमक झालेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यासमोरच डुप्लिकेट कोश्यारी यांचे धोतर फेडून निषेध करण्यात आला ( NCP Aggressive On Governor Statement ) आहे.

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य

धोतर फेडणाऱ्याला लाखाचे बक्षीस : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याकडून राज्यपालांचे धोतर फेडणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस असे बॅनर ( One Lakh Reward Who Tear Governor Dhoti ) लागले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना जाणून-बुजून भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाठीशी घालत आहेत. सावरकरांविषयी वक्तव्यावर प्रतिक्रिया देणारे मुख्यमंत्री, आज काहीच बोलत नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा ,देवेंद्र फडवणीस ,यांना आम्ही विनंती करतो, की त्याने कोश्यारीची ताबडतोब हकालपट्टी करावी. अन्यथा महाराष्ट्रातील जनता छत्रपतींच्या स्वाभिमानाचे रक्षण करण्यासाठी सक्षम आहे. मग जर त्यांची हकालपट्टी नाही केली. तर आम्ही कुठल्याही क्षणी कुठेही राज्यपालाचे धोतर फेडू. अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मांडली ( Protest Tear Governor Koshyari Dhoti ) आहे.

गावागावात आंदोलन

राज्यपालांना पाणी पाजू : गिरगाव चौपाटीवर शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 'नायक नहीं, नालायक हूँ मै, उडाला, उडाला, ताडमाड उडाला, राजभवनाच्या समुद्रात बुडाला, ५० खोके एकदम ओके' अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. सुधांशु त्रिवेदी यांच्या विरोधातही संताप व्यक्त करण्यात आला. शिवसेनेचे विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली गिरगाव चौपाटीसमोरील प्रेक्षक गॅलरी येथे तीव्र आंनदोन करण्यात आले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाग घेऊन, सतत वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपालांना महाराष्ट्राचे पाणी पाजू, असा थेट इशारा दिला.

शिवभक्त आक्रमक

आंदोलनकर्त्यांची धरपकड : पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड करत ताब्यात घेतले. छत्रपती शिवाजी महाराज मराठी माणूस, महाराष्ट्र, हिंदू नव्हे तर संपूर्ण हिंदुस्तानचे आदर्श राहणारे व्यक्तिमत्व आहेत. राज्यपाल कोश्यारी सातत्याने महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी वादग्रस्त विधाने करत आहेत. दिल्लीच्या बादशहाच्या इशाऱ्यांवरून सतत वक्तव्य करत आहेत, अशी शंका येते. तसेच कोश्यारीकडून सातत्याने महाराष्ट्राची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यांना महाराष्ट्राचे पाणी पाजल्याशिवाय शिवसेना शांत बसणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला.महाराष्ट्राच्या महापुरुषांच्या बाबतीत असे का होत आहे. उत्तराखंडच्या बाबत का होत नाही. कारण, महाराष्ट्र खऱ्या अर्थाने महापुरुषांची, देशभक्तांची आणि स्वातंत्र्यवीरांची जननी आहे. महाराष्ट्राला डॅमेज करायचा जाणीवपूर्वक हा प्रयत्न होताना दिसत असल्याचे दानवे यांनी सांगितले. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

प्रतिमे समोर आंदोलन : पुण्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी रायगडावर येऊन नतमस्तक होत महाराष्ट्राची माफी मागावी, नाहीतर शिवसेना त्यांना पुण्यात फिरू देणार नाही. अशी आक्रमक भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाने आंदोलन करून इशारा दिला आहे. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या प्रतिमे समोर आंदोलन करण्यात आले. यावेळी काही महिला शिवसैनिकाने भारतीय जनता पार्टीचे हे कटकारस्थान असून यात छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वंशज आहेत ते सुद्धा जाऊन बसलेत त्यांनी कुठेतरी या विरोधात भूमिका घेतली पाहिजे आणि त्यातून बाहेर पडले पाहिजे असे भूमिका शिवसेनेने घेतलेली आहे.पुण्यातील अलका चौकामध्ये हे निषेध आंदोलन करण्यात आले. राज्यपालांना परत बोलवा .राज्यपालाने महाराष्ट्राची माफी मागावी .रायगडावर जाऊन नतमस्तक व्हावे .मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाने केलेली आहे. भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, गोपीचंद पडळकर, राज्यपाल, यांनी रायगडावर यावं ,रायगडावर नतमस्तक व्हावं त्याचं लाईव्ह प्रक्षेपण करुन ,महाराष्ट्राचे त्याने माफी मागावी .अशी आक्रमक भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाने घेतलेली आहे.

राज्यपालांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन : नाशिकच्या येवलात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरल्याने या वक्तव्याचे पडसाद उमटले. येवल्यातील ठाकरे गटाच्या शिवसेना, युवासेना तसेच महिला आघाडीच्यावतीने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध करत तहसील कार्यालयावर राज्यपालांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी ठाकरे गटाच्या शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कोश्यारींविरोधात घोषणाबाजी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल राज्यपालं भागतसिंग कोश्यारी यांनी बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील केळवद येथील शिवराणा विचार मंचच्यावतीने शहरातून राज्यपालं कोशियारी यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली. या प्रेतयात्रेत महिला असंख्य पुरुष सामील झाले होते. प्रेत्यात्रेत राज्यपाल कोश्यारी यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. प्रेत्यात्रेत पुढे माणसपुत्र हातात मडके घेऊन चालत होते. तर मागे कोश्यारींविरोधात घोषणाबाजी सुरु होती.

विविध ठिकाणी निषेध मोर्चे : नागपूरात राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना (ठाकरे गट), नागपुर ग्रामीण युवक कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून शहरात विविध ठिकाणी निषेध मोर्चे काढून जोरदार आंदोलने करण्यात आले. सुधांशू त्रिवेदी यांनी आपल्या भाषणामध्ये शिवाजी महाराज यांनी औरंगजेब यांना ५ वेळा पत्र लिहून माफी मागितली असे वादग्रस्त विधान केले आहे. ही विधाने अतिशय बेजबाबदारपणाचे आहे दोघांनी बिनशर्त माफी मागावी अशी मागणी करत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दूनेश्वर पेठे यांच्या नेतृत्वाखाली वेरायटी चौक येथील गांधी पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात आले. त्याशिवाय शिवसैनिक, महिला आघाडी, युवासेनेकडून आंदोलन करण्यात आले. राज्यपाल हटाव अशी मागणी युवक कॉंग्रेसकडून करण्यात आली. आम आदमी पक्षाचे कार्यकर्तेदेखील रस्त्यावर उतरले.

शिवाजी महाराजांचा अवमान : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला असून ते सतत अवमानकारक विधाने करीत आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी करीत काळे झेंडे दाखवून कोश्यारी यांच्या निषेधार्थ शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन केले. राज्यपाल भगतसिंह कोशारी हे महाराष्ट्राचा मानबिंदू संपूर्ण भारतीयांचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सतत निंदाजनक अवमानकारक विधाने करीत आहेत. त्यामुळे भारतातील तमाम शिवप्रेमी शिवभक्त भारतीयांची मने अत्यंत दुखावलेले आहेत. संविधानिक व शासकीय पदावर राहून कोशारी हे राजकीय भाषा बोलतात. त्यांच्या विधानाने समाजात असंतोष पसरत आहे. समाजामध्ये अत्यंत तीव्र प्रकारचा संताप येत असल्यामुळे त्यांना याचा विचार करून पदावरून तात्काळ हटविण्यात यावे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

जोडे मारो आंदोलन, प्रतिमांचे दहन : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वारंवार अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय शिवसैनिक स्वस्थ बसणार नाही असा खळबळजनक इशारा यवतमाळ शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष ढवळे यांनी दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाने यवतमाळच्या दत्त चौकात राज्यपाल कोश्यारी व भाजप प्रवक्ता सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या अपमानजनक वक्तव्याचा निषेध नोंदविला. व त्यांच्या प्रतिमांना जोडे मारो आंदोलन करून प्रतिमांचे दहन केले यावेळी काळी टोपी देखील शिवसैनिकांनी जाळली.

फोटोस जोडे मारून निषेध : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आले. भगतसिंह कोश्यारी यांच्या फोटोस जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसेनाशहरप्रमुख संजय मुंडे,अतिश पाटील,गटनेते सोमनाथ गुरव,संपदाताई धोंगडे ,बाळासाहेब काकडे, प्रवीण कोकाटे ,पंकज पाटील बंडू आदरकर, सुरेश गवळी ,तुषार निंबाळकर,रवी कोरे आळणीकर,गणेश असलेकर, बापू देशमुख,अजित बाकले, दिनेश बंडगर ,नेताजी राठोड, संकेत सूर्यवंशी,मनोज पडवळ, नाना घाडगे,संदीप शिंदे,शिवसैनिक-युवासैनिक उपस्थित होते.

गाढवा वरून धिंड : प्रहारने देखील सोलापूर शहरातील सात रस्ता चौक येथे राज्यपालांचा निषेध करत प्रतिकात्मक रित्या गाढवा वरून धिंड काढली. शिवाजी महाराजांचे मावळे असतील तर ,एक मावळा म्हणून आवाहन करण्यात आले की,राजभवनावर जमा होऊन राज्यपालांचा निषेध करा असे प्रहारचे शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी दिले.प्रहारच्या अजित कुलकर्णी,जमीर शेख,दत्ता म्हस्के पाटील यांनी पुढाकार घेत कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राज्यपालांचा निषेध केला.सात रस्ता चौक येथील मैदानात एका व्यक्तीला राज्यपाल भगतसिंग कोशारी सारखे काळे कोट ,काळी टोपी घालून गाढवा वरून धिंड काढली. शहर अध्यक्ष अजित कुलकर्णी यांनी महाराष्ट्रच्या जनतेला आवाहन केले आहे,अगर तुम्ही खरेच शिवाजी महाराजांचे मावळे असाल तर ,राजभवनावर जमा व्हा.राज्यपालांचा निषेध करा.जोपर्यंत राज्यपाल हटविले जात नाहीत तोपर्यंत,राजभवनावरून सरकू नका असे आवाहन केले आहे.

प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन : हिंगोली जिल्ह्यात शिवसेना व राष्ट्रवादीच्यावतीने राज्यपाल कोश्यारी यांच्या फोटोला जोडो मारून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन देखील करण्यात आले. तर घोषणांनी परिसर चांगलाच दुमदुमून गेला होता. राष्ट्रवादीच्या वतीने कोश्यारी यांच्या फोटोला चोडे मारून, त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. कोश्यारी विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी जिप सदस्य मनीष आखरे, माजी नगराध्यक्ष जगजीतराज खुराणा, बालाजी घुगे आणि जावेद राज यांच्यासह राष्ट्रवादीचे मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होते.

बीड : धोतरानंतर आता टोपीवर लक्ष; राज्यपालांच्या डोक्यावरील काळी टोपी आणा, ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांकडून लाखाचे बक्षीस जाहीर

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरुद्ध राज्यातभरात पडसाद उमटत आहेत. बीडमध्ये ठाकरे गटाने राष्ट्रीय महामार्ग रोखून राज्यपालांच्या प्रतिमेला जोडो मारून निषेध आंदोलन केला. दरम्यान जो कोणी राज्यपालांच्या डोक्यावरील काळी टोपी घेऊन येईल त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल अशी, घोषणा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केलीय.

कोल्हापूर : इतिहास पुसण्याचे भाजपचं षडयंत्र आहे असे आम्हाला ठामपणे वाटत असून आजपर्यंत अशा पद्धतीने कधी घडले नाही. शिवाय राज्यपाल या पदावर असणाऱ्या व्यक्तीकडून सुद्धा अशा पद्धतीने स्वाभिमान डिवचण्याचे काम होत असेल, चुकीच्या पद्धतीने वादग्रस्त वक्तव्य होत असतील तर हे महाराष्ट्रातील जनता खपवून घेणार नाहीत. आजपर्यंत असं कधीही घडलं नाही. छत्रपती शिवराय हे आमच्यासाठी आदर्श होते, आहेत आणि कायमच राहणार आहेत. पण हा इतिहासच पुसण्याचं भाजपचे षडयंत्र असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी म्हटले आहे. ते कोल्हापूरात बोलत होते.

Last Updated : Nov 21, 2022, 10:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.