पुणे - बहुजन वंचित आघाडीने औरंगाबाद येथील जागा बी.जे. कोळसे पाटील यांना सोडू असे म्हटले होते. मात्र, कोळसे पाटील झारखंडमध्ये असताना प्रकाश आंबेडकरांनी औरंगाबाद व्यतीरिक्त सगळीकडे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे कोळसे-पाटलांनी प्रकाश आंबेडकरांबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून बहुजन वंचित आघाडीचा पाठिंबा नाकारला आहे.
प्रकाश आंबेडकरांना काँग्रेसने सोबत घ्यावे यासाठी प्रयत्न करत होतो. तसेच लालूप्रसाद यादव यांनी सोनीया गांधींशी बोलावे यासाठी प्रयत्न केला असल्याचेही कोळसे पाटील म्हणाले. प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केलेल्या उमेदवारीने भाजप आणि संघाला फायदा होणार आहे. त्यामुळे त्यांचा पाठिंबा नाकारल्याचे कोळसे पाटील म्हणाले. औरंगाबादची जागा लढायची की नाही याबद्दल देवेगौडा यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ. जर जागा मिळाली तर लढणार असेही कोळसे पाटील यांनी स्पष्ट केले.