ETV Bharat / state

PM Modi Dehu Visit : पालखी मार्गावर दुतर्फा झाडे लावण्याची महाराजांनी पंतप्रधानांकडून अपेक्षा - Pune PM Visit

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी देहूत येणार ( PM Modi Dehu Visit ) आहेत. त्यांच्या हस्ते शिळा मंदिर आणि जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यापूर्वी देहू विश्वस्तांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे काही अपेक्षा व्यक्त केल्यात.

PM Modi Dehu Visit
संजय महाराज मोरे
author img

By

Published : Jun 13, 2022, 10:49 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी देहूत येणार ( PM Modi Dehu Visit ) आहेत. त्यांच्या हस्ते शिळा मंदिर आणि जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यापूर्वी देहू विश्वस्तांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे काही अपेक्षा व्यक्त केल्यात. महाराष्ट्रातील सर्वच तिर्थक्षेत्रांचा शासनाच्या माध्यमातून विकास करावा, गंगेची स्वछता करण्यात आली तशीच इंद्रायणी स्वच्छ करावी अशी मागणी अन अपेक्षा विश्वस्त माणिक महाराज मोरे, संजय महाराज मोरे यांनी व्यक्त केली आहे.

महाराजांंनी झाडे लावण्याची केली अपेक्षा - देहू नगरी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. शिळा मंदिर, जगतगुरु संत तुकाराम महाराज मूर्तीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यापूर्वी देहू संस्थानने काही अपेक्षा व्यक्त केल्यात. माणिक महाराज मोरे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून वारकरी संप्रदायाला खूप अपेक्षा आहेत. पालखी सोहळा, आषाढी कार्तिकीच नियोजन कुंभमेळ्याच्या धर्तीवर व्हावे. पालखी मार्ग होतायेत, त्याच्या दुतर्फा झाडे लावावीत. जेणेकरून वारकऱ्यांना विसाव्यासाठी सावली मिळेल. महाराष्ट्रातील सर्वच तिर्थक्षेत्राचा शासकीय पातळीवर विकास व्हावा. याला सर्वांनी सहकार्य करावे या अपेक्षा पंतप्रधान मोदीं पूर्ण करतील अस देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी म्हटले आहे. तर संजय महाराज मोरे म्हणाले की, देहूतील इंद्रायणी स्वच्छ व्हावी, गंगेच ज्या प्रकारे काम सुरू आहे तसे इंद्रायणीच व्हावे असे संजय महाराज मोरे यांनी म्हटले आहे.

PM Modi Dehu Visit
देहू तुकाराम महाराज मंदिर

पगडीवरील अभंग बदलला - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातील देहू येथील संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराच लोकार्पण करणार आहेत. यावेळी मंदिर ट्रस्टच्यावतीने पुण्यातील मुरुडकर झेंडेवाले यांच्याकडून विशेष तुकाराम पगडी ( Tukaram Pagdi ) मोदींना भेट देण्यासाठी बनविण्यात आली ( Special Tukaram Pagdi For PM ) आहे. या पगडीवर संत तुकाराम महाराज यांच्या अभंगांच्या काही पद लिहिण्यात आल्या होता. या पदाला काहींनी आक्षेप घेतल्याने आता हे अभंग बदलण्यात आल्या ( Tukaram Pagdi Abhang changed ) आहे.

'असा' असेल पुणे दौरा - पंतप्रधान मोदी दुपारी 1.45 च्या सुमारास देहू येथील जगतगुरु श्रीसंत तुकाराम महाराज शिळा मंदिराचं लोकार्पण करतील. त्यानंतर सायंकाळी 4:45 च्या सुमाराला पंतप्रधान मुंबई मधील जल भूषण इमारत आणि राज भवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं लोकार्पण करतील. संध्याकाळी 6 च्या सुमाराला पंतप्रधान मुंबईतल्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात सहभागी होतील.

देहूत व्हीआयपींनाच प्रवेश - पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सकाळी 8 वाजल्यापासून जुना मुंबई महामार्गावरून देहूत व्हीआयपी व्यक्तींनाच प्रवेश असेल. इतर वाहनांना प्रवेश नाही. सभास्थळी जाण्यासाठी तीन रस्ते ठेवण्यात आले आहेत. तळवडे, म्हाळुंगे आणि इंदोरी बाजूने या मार्गावरूनच नागरिक येऊ शकतात. पण, देहू गावात प्रवेश करण्यास मनाई आहे. नागरिकांच्या वाहनांची बायपासला सोय करण्यात आली आहे. खंडेलवाल चौकापासून परंडवाल चौकापर्यंत येण्यासाठी 20 बस आहेत. तिथून चालत सभास्थळी यायचं आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी दिली आहे.

मंदिराची पूर्णबांधणी - संत तुकाराम हे वारकरी संप्रदायाचे संत आणि कवी होते. जे त्यांचे अभंग आणि अध्यात्मिक किर्तनाच्या माध्यमातून केलेल्या समाजाभिमुख पूजनासाठी ओळखले जातात. ते देहू इथे रहायचे. त्यांच्या निधनानंतर एक शिला मंदिर बांधण्यात आलं, पण त्याची औपचारिक रचना देऊळ म्हणून करण्यात आली नव्हती. या मंदिराची 36 शिखरांसह दगडी पुनर्बांधणी करण्यात आली. संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

हेही वाचा - Tukaram Pagdi : पंतप्रधानांना देण्यात येणाऱ्या तुकाराम पगडीवरील अभंग बदलला; 'हे' आहे कारण

हेही वाचा - Special Tukaram Pagdi For PM : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी तयार होत आहे स्पेशल तुकाराम पगडी

हेही वाचा - PM Modi To Visit Maharashtra : पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात; देहू, मुंबईतील कार्यक्रमांत होणार सहभागी, वाचा संपूर्ण दौरा...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.