पुणे : गेल्या काही दिवसांपासून बहुचर्चित असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आत्ता दरोरोज नवनवीन ट्रविस्ट येत आहे. एकीकडे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहमदनगर येथे जाहीर करण्यात आली आहे. तर आत्ता दुसरीकडे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष (President of Wrestling Federation of India) बृजभूषण सिंह भेट घेतली आणि आत्ता येत्या 11 ते 15 जानेवारी दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन पुण्यात होणार असून 15 जानेवारीला होणाऱ्या अंतिम लढतीसाठी येण्याचे आमंत्रण बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांनी आमंत्रण स्वीकारले आहे.
कुस्ती स्पर्धेचे आयोजन : पुण्यात 11 ते 15 जानेवारी दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 15 जानेवारीला होणाऱ्या अंतिम लढतीसाठी येण्याचं आमंत्रण बृजभूषण सिंह यांनी आमंत्रण स्वीकारले आहे. त्यासाठी 14 जानेवारीलाच ते पुण्यात येणार आहेत. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा वाद मिटवताना भाजपचे खासदार रामदास तडस यांना कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष बनवण्यात (Brijbhushan Singh on Kesari Wrestling Tournament) आले.
अयोध्या दौऱ्याला विरोध : बृजभूषण सिंह हे भाजपचे खासदार आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जून महिन्यातील अयोध्या दौऱ्याला त्यांनी विरोध केला होता. त्यामुळे राज ठाकरे आयोध्येला जाऊ शकले नव्हते. त्यावेळी बृजभूषण सिंह आणि राज ठाकरे यांच्यात वाद निर्माण झाले होते. मनसेने त्यांच्या भूमिकेचा विरोध केला होता. आता बृजभूषण सिंह पुण्यात येणार असून मनसे याबाबत काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष असणार (Maharashtra Kesari Wrestling Tournament) आहे.
स्पर्धा कुठे होणार ? गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद तसेच इतर संघटनेच्या वादामुळे महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही कुठे होणार ? याबाबत मल्ल्यांसह आयोजकांमध्ये देखील संभ्रम निर्माण झाला होता. सुरवातीला पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा होणार असे जाहीर झाले. त्यानंतर पुन्हा नगर आणि मग गेल्या काही दिवसांपासून दोन्ही ठिकाणी ही स्पर्धा होणार असे सांगितले जात होते. पण आत्ता पुण्यात ही स्पर्धा होणार असल्याचे भारतीय कुस्तीगीर महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांनी जाहीर केले (Maharashtra Kesari Wrestling) आहे.