ETV Bharat / state

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज पुण्यात; राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 145 व्या तुकडीचं दिमाखदार संचलन, राष्ट्रपतींची उपस्थिती

President Murmu Visit To NDA : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) आणि सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी), लोणावळा इथल्या नौदलाच्या आयएनएस शिवाजी, लोणावळ्यातील कैवल्यधाम इथल्या योगसंस्था इथं उपस्थित राहणार आहेत.

President Draupadi Murmu
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 30, 2023, 9:27 AM IST

पुणे President Murmu Visit To NDA : पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमी अर्थात राष्ट्रीय संरक्षण अकादमीचं दीक्षांत संचलन आज (30 नोव्हेंबर) होत आहे. प्रबोधिनीतील खडतर प्रशिक्षणानंतर एनडीएची 145 वी तुकडी प्रत्यक्ष देशसेवेसाठी भारतीय संरक्षण दलात दाखल होणार आहे. एनडीएतील क्षेत्रपाल मैदानावर हा दिमाखदार सोहळा संपन्न होत आहे. दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या दीक्षांत सोहळ्याच्या प्रमुख पाहुण्या असून दीक्षांत संचलनाची मानवंदना त्या स्वीकारणार आहेत.

विशेष कामगिरी केलेल्या जवानांचा होणार सत्कार : लष्करी शिस्त, सेवाभाव आणि राष्ट्रभक्तीचं दर्शन या सोहळ्यातून घडत असतं. एनडीएतील प्रशिक्षणादरम्यान विशेष कामगिरी केलेल्या जवानांचा याप्रसंगी विविध पदकं देऊन गौरव करण्यात येतो. दीक्षांत संचालनाचा हा सोहळा स्वप्नपूर्तीचा अनुभव असतो. इथून बाहेर पडल्यानंतर ते सैन्यदलात अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत.

कैवल्यधाम योगसंस्थेच्या कार्यक्रमास राहणार उपस्थित : दौऱ्यात त्या राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) आणि सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय (एएफएमसी), लोणावळा इथल्या नौदलाच्या आयएनएस शिवाजी, लोणावळ्यातील कैवल्यधाम इथल्या योगसंस्था इथं उपस्थिती राहणार

शुक्रवारी रवाना होणार नागपूरकडं : राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या दीक्षांत संचलन सोहळ्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू नगर जिल्ह्यातील राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाला भेट देऊन पुण्यातील राजभवन इथं मुक्कामी येणार आहेत. दरम्यान, शुक्रवारी (1 डिसेंबर) राष्ट्रपती मुर्मू राजभवन इथून वानवडी इथल्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयातील (एएफएमसी) कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यानंतर त्या पुणे दौरा आटोपून दुपारी लोहगाव विमानतळावरुन नागपूरकडं प्रयाण करणार आहेत.

हेही वाचा -

  1. योग व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग - द्रौपदी मुर्मू
  2. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिशिंगणापूर दौऱ्यावर; शनिदेवाच्या चौथऱ्यावरुन घेणार दर्शन
  3. Narvekar Meet President Droupadi Murmu : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या भेटीला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.