पुणे - पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान होते आहे. मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. तर पोलीस प्रशासनानेही कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने तयारी पूर्ण केली आहे.
पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकासाठी 62 तर शिक्षक मतदार संघासाठी 35 उमेदवार रिगणात आहेत. पदवीधर मतदारसंघात भाजपाचे संग्राम देशमुख आणि महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड यांच्यात प्रमुख लढत आहे. तर शिक्षक मतदारसंघामध्ये भाजपाने राज्य शिक्षक परिषदेचे जितेंद्र पवार यांना पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे जयंत आसगावकर उभे आहेत.
ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था राहणार -
पुणे जिल्ह्यात पदवीधर मतदार संघासाठी 232 तर शिक्षक मतदार संघासाठी 125 मतदान केंद्र आहेत. यात सर्वाधिक हवेली तालुक्यात एकूण 154 मतदान केंद्रे आहेत. पुण्यातील मतदान केंद्राच्या सुरक्षेसाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह जवळपास 800 पोलीस कर्मचारी केवळ मतदान केंद्र आणि त्या बाजूच्या परिसराच्या तैनात करण्यात आले आहेत. सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यत मतदानाची वेळ आहे. या काळात ठिकठिकाणी अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार आहे.
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 15 किमी हद्द लक्षात घेऊन मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. पुणे विभागात पदवीधर मतदार संघासाठी एकूण मतदार 4 लाख 26 हजार 257 मतदार आहेत. तर शिक्षक मतदार संघात 72 हजार 545 मतदार आहेत.
हेही वाचा - 'शेतकरी आहेत म्हणून देश आहे; मोदींनी त्यांच्याशी चर्चा करायला हवी..'
पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघाची पुणे जिल्ह्याची माहिती
पदवीधर एकूण उमेदवार : 62
शिक्षक एकूण उमेदवार : 35
पुणे जिल्ह्यातील एकूण पदवीधर मतदार : 136611
पुणे जिल्ह्यातील एकूण शिक्षक मतदार : 32201
पुणे जिल्ह्यातील पदवीधर एकूण मतदान केंद्र : 232
पुणे जिल्ह्यातील शिक्षक एकूण मतदान केंद्र : 125
पुणे जिल्ह्याच्या मतदार यादीतील आपले नाव शोधण्यासाठी आणि मतदान केंद्राची माहिती घेण्यासाठी खालील संकेतस्थळ व लिंकचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. लिंक पुढीलप्रमाणे -