ETV Bharat / state

Praveen Chauhan Resign : निःपक्षपाती तपास व्हावा म्हणून मी राजीनामा दिला, प्रवीण चव्हाण यांची माहिती

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Pendrive ) यांनी विधानसभेत स्टिंग ऑपरेशनसंदर्भात खुलासा केला होता. ‘महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना..’ असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एका पेन ड्राईव्ह दिला होता. या गुन्ह्याचा तपास निःपक्षपाती पणे व्हावा म्हणून मी त्या गुन्ह्यातून राजीनामा ( Praveen Chauhan Reaction After Resign ) दिला आहे, अशी माहिती यावेळी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी दिली.

Devendra Fadnavis Pendrive
Devendra Fadnavis Pendrive
author img

By

Published : Mar 14, 2022, 7:54 PM IST

पुणे - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis Pendrive ) यांनी विधानसभेत स्टिंग ऑपरेशनसंदर्भात खुलासा केला होता. ‘महाविकास आघाडीचा महाकत्तलखाना..’ असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत एका पेन ड्राईव्ह दिला होता. याची गंभीर दखल घेत याचा तपास सीआयडीकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ज्या गुन्ह्याच तपास सरकारी वकील प्रवीण चव्हाण करत होते, त्या गुन्ह्याच्या चौकशीतून त्यांनी राजीनामा ( Praveen Chauhan Resign ) दिला आहे. या गुन्ह्याचा तपास निःपक्षपाती पणे व्हावा म्हणून मी त्या गुन्ह्यातून राजीनामा ( Praveen Chauhan Reaction After Resign ) दिला आहे, अशी माहिती यावेळी सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी दिली.

काय आहे प्रकरण -

जळगावच्या एका शिक्षण संस्थेवर ताबा मिळवण्यासाठी लोकांना धमकवल्याचा तसंच अपहरणाचा आरोप माजी मंत्री आणि भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्याविरुद्ध आहे. याचा तपास सरकारी वकील प्रवीण चव्हाण करत होते. त्याच्यावर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केल्यानंतर त्याचा तपास हा निःपक्षपाती पणे व्हावा म्हणून मी राजीनामा दिला असल्याचं यावेळी चव्हाण यांनी सांगितलं.

सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी याप्रकरणात तेजस मोरे याच्यावर देखील आरोप केल आहे. त्यानेच माझ्या कार्यालयात येऊन घड्याळ बसविली आणि त्याद्वारेच स्टिंगऑपप्रेशन केलं असल्याचं चव्हाण यांनी यावेळी सांगितले. तसेच आत्ता जी चौकशी होणार आहे, त्या चौकशीत सर्वकाही पुढे येणार आहे. तसेच तेजस मोरे जो काही आरोप करत आहे, त्यात काहीच तथ्य नाही. हा तेजस मोरे सर्वप्रथम माझ्याकडे एसी बसविण्यासाठी आग्रह करत होता. मग मी नाही म्हटल्यावर त्याने स्मार्ट टीव्ही बसविण्याचा आग्रह केला. नंतर त्याने मी नसताना माझ्या कार्यालयात घडयाळ बसवले आणि मग हा कट रचला गेला. या तेजस मोरेचा या प्रकरणात कसा संबंध आहे, याचं माझ्याकडे सर्व पुरावे असल्याचं यावेळी चव्हाण यांनी सांगितलं.

हेही वाचा- BMC Issue Notice Narayan Rane : पंधरा दिवसांत बांधकाम हटवा, पालिकेची नारायण राणेंना नोटीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.