ETV Bharat / state

नोकरी सोडून भाजपात प्रवेश करतांना सत्ता येईल की नाही, माहीत नव्हतं- जावडेकर

author img

By

Published : Feb 7, 2021, 10:37 PM IST

कोणत्या पदासाठी नव्हे तर कामाचा आनंद घेण्यासाठी काम करायचं, हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शिकवलं, अशा अनेक आठवणींना माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उजाळा दिला.

जावडेकर
जावडेकर

पुणे (पिंपरी)- बँकेतील नोकरी सोडून भाजपात प्रवेश करत असताना भाजपाची सत्ता येईल की नाही हे माहीत नव्हतं. कोणत्या पदासाठी नव्हे तर कामाचा आनंद घेण्यासाठी काम करायचं, हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शिकवलं, अशा अनेक आठवणींना माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी उजाळा दिला. ते पिंपरी-चिंचवडमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 55 व्या महाराष्ट्र प्रदेश अधिवेशनात बोलत होते.

युवकांनी नेहमीच बंडखोर असावे-
जावडेकर म्हणाले की, मी बँकेत नोकरी करत होतो. ती सोडून भाजपात प्रवेश करणार होतो. त्याअगोदर बँकेत माझा निरोप समारंभ करण्यात आला. त्या भाषणात मी म्हटलं होतं की भाजपात प्रवेश करत आहे. पण मला माहित नाही भाजपा सत्तेत येईल की नाही. त्यानंतर म्हणाले की, कोणत्या पदासाठी नव्हे तर कामाचा आनंद घेण्यासाठी काम करायचं, हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शिकवलं. युवकांनी नेहमीच बंडखोर असावे. विद्यार्थी दशेत अनेक सत्याग्रह आणि आंदोलनांत आम्ही सहभागी झालो. परिषदेने अनेकांच्या विचारांना चालना दिली, असे जावडेकर म्हणाले.
सत्याग्रहात सहभागी झाल्यानंतर 16 महिने जेलमध्ये होतो-
जयप्रकाश नारायण यांचे भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन सुरू होते. त्यावेळी आम्ही त्यात सहभागी झालो. देशात आणबाणी लादण्यात आली. त्यावेळी देखील सत्याग्रह केले. व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढा दिला. सत्याग्रह केल्याने जेलमध्ये जाण्याची भीती होती. तरीही सत्याग्रहात सहभागी व्हायचे या जिद्दीने यात सहभागी झालो. या काळात 16 महिने जेलमध्ये सुद्धा होतो, असे जावडेकर यांनी नमूद केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.