पुणे: सोशल मीडिया वापरात असाल तर जपूनच वापरण्याची गरज आहे. वंचित आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांची सोशल मीडियावर बदनामी केल्या प्रकरणी दीपक कोंढरे या तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे.
दीपक कोंढरे या तरुणाने गनिमी कावा संघटनेचे अध्यक्ष संजय हरिदास वाघमारे यांच्या मोबाईलवर फोन करत बाळासाहेब आंबेडकर यांना घेऊन पोलीस ठाण्यात जावून माझी तक्रार करतो का ? म्हणून शिवीगाळ केली आहे. दीपक कोंढरे हा मुंबईतील पवई परिसातील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातील बिबवेवाडी पोलिस स्थानकात आॕट्रासिटीसह इतर गंभीर कलमान्वे कोंढरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोशल मीडियातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले: काही दिवसापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा सोशल मीडियावरून बदनामी शिवीगाळ करण्यात आली. त्यामुळे आरोपीविरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. त्यानंतर गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्रामध्ये सातत्याने लोकप्रिय नेत्यांच्या विरोधामध्ये सोशल मीडियामध्ये अशा प्रकारच्या भाषा वापरण्यात येत आहे. त्या संदर्भात गुन्हे दाखल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियातील गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. या सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.
प्रकाश आंबेडकर विविध विधानांमुळे चर्चेत: राज्यभरात औरंगजेबाच्या नावावरून राजकारण सुरू असताना नुकतेच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. या भेटीमुळे ठाकरे गटाचे नेते व इतर नेत्यांनी टीका केली. आम्ही औरंगजेबाच्या दरबारात जयचंद हे चाकरीला होते. इंग्रजांच्या काळात देखील याच जयचंदमुळे 200 वर्षे पारतंत्र्यात राहावे लागले, अशी टीका आंबेडकर केली. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत सामील होण्याची जाहीर इच्छा केली होती. उद्धव ठाकरे यांची भेट घेत महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याबाबत चर्चादेखील केली होती. मात्र, राष्ट्रवादीकडून वंचितला विरोध असल्याची राजकीय वर्तुळाच चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडीला जागा वाटपात काय स्थान द्यायचे यावरून मतभेद असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा-