पुणे : मुंबईत उद्या तसंच परवा असे दोन दिवस INDIA आघाडीची महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीत शिवसेनेचा मित्र पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीला निमंत्रण नाही. यावर आता वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही शिवसेनेसोबत आहोत. आम्हाला INDIA आघाडीचं निमंत्रण नाही. त्यामुळे ते जेव्हा निमंत्रण देतील तेव्हा आमची भूमिका स्पष्ट करु असं, प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. (Prakash Ambedkar On Uddhav Thackeray)
उद्धव ठाकरे आमचे वकील : 2019 मध्ये देखील आम्ही काँग्रेसला ऑफर दिली होती. आता देखील त्यांना आम्ही ऑफर दिली आहे. मात्र, काँग्रेसचं निमंत्रण नसल्यामुळं आम्ही त्या इंडिया आघाडीमध्ये नाही. आम्ही शिवसेने बरोबर असल्यानं उद्या होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे आमचे वकील आहेत. तेच आमची बाजू मांडतील, असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आमचा समावेश महाविकास आघाडीमध्येसुद्धा नसल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
उद्धव ठाकरे आमची भूमिका मांडतील : इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत आम्ही आमची भूमिका उद्धव ठाकरे यांच्या समोर मांडली आहे. ते आमची भूमिका इंडिया आघाडीसमोर मांडतील, याची मला खात्री आहे. काँग्रेसनं आम्हाला का लांब ठेवलं, हे मला विचारण्यापेक्षा त्यांनाच विचारायला हवं असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. (India Meeting Today)
आम्हाला इंडियाचं निमंत्रण नाही : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी इंडिया आघाडीबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रकाश आंबेडकर म्हणाले, त्यांनी आगोदर इंडिया आघडीचं त्यांना निमंत्रित आहे का? ते सांगावं. नंतरच इंडिया आघाडीत सामाविष्ट होण्याचा प्रश्न येतो. निमंत्रणच नसेल तर, इंडिया आघाडीत येण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचं ते म्हणाले. आम्हाला निमंत्रण नसल्यामुळं आम्ही इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित नसल्याचं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. (Raju Shetty)
भीमा कोरेगावची चौकशी व्हायला हवी : भीमा कोरेगावच्या चौकशीबाबत आंबेडकर म्हणाले की, आज दिलेल्या साक्षीचा काही भाग इतिहासाचा होता, तर काही भाग तपासाचा आहे. पोलिसांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात एक जण बेपत्ता आहे. त्यात ग्रामपंचायतीनं दंगलीबाबत ठराव केला होता. याची चौकशी झाली पाहिजे, असंही आंबेडकर म्हणाले. (Bhima Koregaon case)
हेही वाचा -