ETV Bharat / state

भाजप-सेना हे मस्तावलेले सरकार - प्रकाश आंबेडकर

खोट्या राष्ट्रवादात अडकू नका. अर्थव्यवस्था बिघडत चालली आहे. आणखी 5 नॅशनल बँका डुबणार आहेत. त्या डुबण्यापासून वाचवने आपल्या हातात आहे. हे मस्तावलेले सरकार आहे, असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Oct 17, 2019, 7:48 AM IST

पुणे - हे सरकार मस्तावलेले बेलगाम घोडा आहे. त्याला पकडण्याची गरज असून त्याला वठणीवर आणावे लागेल, अशी टीका वंचित बहुजन आघाडी प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. निवडणुका आल्यावरच देशाला धोका कसा असतो आणि निवडणुका संपल्या की सर्व शांतता कशी असते? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केली. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित सभेमध्ये बोलत होते.

प्रकाश आंबेडकर, वंचित बहुजन आघाडी प्रमुख

यावेळी आंबेडकर म्हणाले, की खोट्या राष्ट्रवादात अडकू नका. अर्थव्यवस्था बिघडत चालली आहे. आणखी 5 नॅशनल बँका डुबणार आहेत. त्या डुबण्यापासून वाचवणे आपल्या हातात आहे. हे मस्तावलेले सरकार आहे, निवडणुकांचे निकाल अगोदरच जाहीर होत आहेत. जिंकणार आहात तर निवडणुका कशाला लढवत आहात, निवृत्त व्हा, असा टोलाही प्रकाश आंबेडकरांनी शिवसेना-भाजपला लगावला.

हेही वाचा - बारामतीकरांनो कलंक म्हणून जगू नका - प्रकाश आंबेडकर

मोदी म्हणतात, की, देशाला फार मोठा धोका आहे. देशात स्फोट होण्याची शक्यता आहे. तर मग एवढी माहिती मिळत असेल, तर लोकांना का सांगता. संरक्षण यंत्रणेला सोबत घेऊन संबधितांना पकडा, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

हेही वाचा - तुम्ही महाराष्ट्राच्या भविष्याचे मारेकरी - अमोल कोल्हे

Intro:mh_pun_01_avb_prakash_ambedkar_mhc10002Body:mh_pun_01_avb_prakash_ambedkar_mhc10002

Anchor:- हे सरकार मस्तावलेले बेलगाम घोडा आहे. त्याला पकडण्याची गरज असून त्याला वठणीवर आणायचं असल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. निवडणूका आल्या की देशाला धोका कसा होता आणि निवडणूका संपल्या की सर्व शांतता असते असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सत्ताधारी मोदी सरकार ला केला आहे. ते पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित केलेल्या सभेमध्ये बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, खोट्या राष्ट्रवादात अडकू नका अर्थव्यवस्था बिघडत चालली आहे. अर्थमंत्री सीतारामन यांचे पती म्हणतात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे बसावं आणि अर्थव्यवस्थेतील धडे घ्यावेत असा सल्ला आपल्या पत्नीला देत आहेत. अजून पाच नॅशनलाइज बँक डुबणार आहेत. त्या डूबण्यापासून वाचवने आपल्या हातात आहे, असल्याचे आंबेडकर म्हणाले. हे मस्तावलेलं सरकार आहे, निवडणुकांचे निकाल अगोदरच जाहीर होत आहेत. जिंकणार आहात तर निवडणूका कशाला लढवत आहात निवृत्त व्हा. मस्तावलेलं बेलगाम घोडा आहे त्याचा लगाम पकडण्याची गरज आहे. त्याला वठणीवर आणणार असल्याचा प्रकाश आंबेडकर म्हणाले.

पुढे ते म्हणाले, पंतप्रधान मोदींना समजलं की आपण निवडणूक हारत आहोत. आपल्या ला पाहिजे तस यश येत नाही, तेव्हा, मोदी म्हणत आहेत देशाला फार मोठा धोका निर्माण झाला आहे आणि ब्लास्ट होण्याची शक्यता आहे. एवढी माहिती मिळाली असेल की ब्लास्ट होणार आहे. संरक्षण यंत्रणेला सोबत घेऊन संबंधिताला पकडा, लोकांना कशाला सांगताय? तुमचं जे सरकार आहे लोकांनी मतदान केलेले आहे ते माहिती देण्यासाठी नाही. तर जो कोणी असेल त्याला पकडण्यासाठी दिलं आहे, मग पकडत का नाही. निवडणूक आल्या की देशाला धोका कसा होता? निवडणूक संपल्या की सर्व शांतता होते असे ते म्हणाले.

साउंड बाईट:- प्रकाश आंबेडकर- अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.