ETV Bharat / state

43 पाणीपुरवठा योजनांना महावितरणचा शॉक, सोमेश्वर विभागात २ कोटी २ लाखांची थकबाकी - Baramati Latest News

सोमेश्वर विभागांतर्गत येणाऱ्या सोमेश्वर, मोरगाव, सुपा, निरा आणि वडगाव या शाखांमधील ४३ पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करून महावितरणने या ग्रामपंचायतींना ऐन उन्हाळयामध्ये शॉक दिला आहे. पाणीपुरवठा बंद झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.

43 पाणीपुरवठा योजनांना महावितरणचा शॉक
43 पाणीपुरवठा योजनांना महावितरणचा शॉक
author img

By

Published : Feb 27, 2021, 4:20 PM IST

बारामती- सोमेश्वर विभागांतर्गत येणाऱ्या सोमेश्वर, मोरगाव, सुपा, निरा आणि वडगाव या शाखांमधील ४३ पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करून महावितरणने या ग्रामपंचायतींना ऐन उन्हाळयामध्ये शॉक दिला आहे. सोमेश्वर शाखेतील ६ पाणीपुरवठा योजना, मोरगाव शाखेतील ३ पाणीपुरवठा योजना, सुपा शाखेतील १४ पाणीपुरवठा योजना, निरा शाखेतील १२ पाणीपुरवठा योजना तर वडगाव निंबाळकर शाखेतील १९ पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे. वीजबिल थकल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महावितरणच्या वतीने देण्यात आली आहे.

1 कोटी 70 लाखांची थकबाकी

वीजबिल थकल्याने पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. या ४३ पाणीपुरवठा योजनांकडे एकूण 1 कोटी 70 लाखांची थकबाकी आहे. सोमेश्वर शाखा २३ लाख ९७ हजार रु., मोरगाव शाखा ८ लाख ४३ हजार रु., निरा शाखा ३८ लाख ७७ हजार रु., सुपा शाखा ३० लाख १५ हजार तर वडगाव निंबाळकर शाखेकडे ६५ लाख ८२ हजारांची थकबाकी आहे. दरम्यान अचानक वीजपुरवठा खंडीत झाल्याने आता नागरिकांवर पाण्यासाठी वनवन भटकण्याची वेळ आली आहे. ग्रामपंचायतींनी ही थकबाकी लवकरात लवकर भरावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.

थकबाकी भरून सहकार्य करावे

सोमेश्वर महावितरण विभागांतर्गत येणाऱ्या तब्बल 43 पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यातील काही ग्रामपंचायतींकडे महावितरणची 10 लाखांच्या आसपास थकबाकी आहे. एवढी थकबाकी होईपर्यंत ग्रामपंचायती काय करत होत्या असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. दरम्यान ग्रामपंचायतींनी पाणीपुरवठा योजनांची थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन उपकार्यकारी अधिकारी सचिन म्हात्रे यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.