ETV Bharat / state

पुणे : ओबीसी आरक्षण बचावासाठी पोतराज आंदोलन

author img

By

Published : Nov 3, 2020, 2:03 PM IST

Updated : Nov 3, 2020, 2:11 PM IST

ओबीसी-व्हीजेएनटी प्रवर्गाच्या विविध संघटनांतर्फे आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यासाठी अनोखे पोतराज आंदोलन केले. समाजाने राज्यात 'ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन' सुरू केले आहे. या आंदोलनात प्रा. लक्ष्मण हाके यांनी पोतराजाचा वेष धारण केला होता.

ओबीसी आरक्षण बचाव पोतराज आंदोलन
ओबीसी आरक्षण बचाव पोतराज आंदोलन

पुणे - ओबीसी-व्हीजेएनटी प्रवर्गाच्या विविध संघटनांतर्फे आंदोलन करण्यात आले. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यासाठी अनोखे पोतराज आंदोलन केले. समाजाने राज्यात 'ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन' सुरू केले आहे.

ओबीसी आरक्षण बचाव पोतराज आंदोलन

हेही वाचा - 'कोल्हापूरमध्ये आजही निवडून येईन, हरलो तर राजकारण सोडून हिमालयात जाईन'

'संवैधानिक न्याय्य मागण्यांसाठी मंगळवारी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास जातींचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. त्याचा विचार सरकारने करावा. त्यातच सध्या उद्भवलेल्या परिस्थितीचा ओबीसी आणि एकंदरीत सर्वसामान्य विद्यार्थी, परिक्षार्थी आणि सरळसेवा भरती प्रक्रियेवर परिणाम झालेला दिसून येत आहे. समाजाने राज्यात 'ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन' सुरू केलेले आहे. ओबीसींचे सर्व प्रश्न सुटेपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने आंदोलने सुरूच राहणार आहेत. याच आंदोलनाचा भाग म्हणून आज पोतराज आंदोलन करण्यात आले आहे,' असे समाजातर्फे सांगण्यात आले.

ओबीसी आरक्षण बचाव पोतराज आंदोलन
ओबीसी आरक्षण बचाव पोतराज आंदोलन

या आंदोलनात प्रा. लक्ष्मण हाके यांनी पोतराजाचा वेष धारण केला होता. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर पोतराज आंदोलन करण्यात आले आणि आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी विविध संघटनांचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते.

हेही वाचा - फेसबुकवर महिलेशी मैत्री करणे पडले 40 लाखात, दिल्लीतून सात आरोपींना अटक

Last Updated : Nov 3, 2020, 2:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.