पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याचे दिसून येत आहेत. या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे. पाटस येथील पुणे-सोलापूर महामार्गावरील टोल नाक्यावर जोरदार टोल वसुली सुरू असते. मात्र या रस्त्यावरील खड्डे वाहनचालकांसाठी धोकादायक असून या खड्डयांची दुरुस्ती करण्याकडे का दुर्लक्ष केल जात आहे? असा प्रश्न वाहनचालक करीत आहेत. यावरून आता भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खड्डयांमुळे अपघाताची शक्यता; भाजप युवा मोर्चाकडून रस्ता दुरुस्तीची मागणी - टोल वसूली सुरूच
दुचाकी स्वार आणि अवजड वाहनांना या खड्ड्यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्याचे चित्र दिसत आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हे खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत, अशी मागणी नागरिक आणि वाहन चालक करीत आहेत. भाजप युवा मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मनोज फडतरे यांनी पुणे-सोलापूर महामार्गावरील खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे.
पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याचे दिसून येत आहेत. या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होण्याची शक्यता आहे. पाटस येथील पुणे-सोलापूर महामार्गावरील टोल नाक्यावर जोरदार टोल वसुली सुरू असते. मात्र या रस्त्यावरील खड्डे वाहनचालकांसाठी धोकादायक असून या खड्डयांची दुरुस्ती करण्याकडे का दुर्लक्ष केल जात आहे? असा प्रश्न वाहनचालक करीत आहेत. यावरून आता भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
दौंड
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यात
अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याचे दिसून येत आहे .या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे . पाटस येथील पुणे - सोलापूर महामार्गावरील टोल नाक्यावर जोरदार टोल वसुली सुरू असते . मात्र या रस्त्यावरील खड्डे वाहनचालकांसाठी धोकादायक असून या खड्डयांची दुरुस्ती करण्याकडे का दुर्लक्ष केल जात आहे ? असा प्रश्न वाहनचालक करीत आहेत .
दुचाकी स्वार आणि अवजड वाहनांना या खड्ड्यांचा त्रास होत असल्याचे चित्र दिसत आहे . पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हे खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत अशी मागणी नागरिक आणि वाहन चालक करीत आहेत .
भाजपा युवा मोर्चा चे पुणे जिल्हा उपाध्यक्ष मनोज फडतरे यांनी पुणे -सोलापूर महामार्गावरील खड्डे बुजवण्याची मागणी केली आहे . जर महामार्गावरील खड्डे लवकर बुजवले नाहीतर आमदार राहुल कुल यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चा च्या वतीने आंदोलन करणार असल्याचे माहिती दिली .
पाटस येथील टोल नाक्याचे जनसंपर्क अधिकारी वैभव चव्हाण यांच्याकडे पुणे- सोलापूर महामार्गावरील खड्डयांबाबत विचारणा केली असता , डांबर प्लँट बंद असल्याने काम बंद होते , उद्या पासून महामार्गावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती दिली .Conclusion: