पुणे - गेल्या काही वर्षांमध्ये नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे प्रमाण वाढले आहे. काही मराठी कुटुंबेदेखील अमेरिका, आस्ट्रेलिया, लंडन, जर्मनी यासारख्या विविध देशांमध्ये स्थायिक झाली आहेत. त्यामुळे घरगुती चविष्ट फराळांचा आस्वाद सातासमुद्रापार असलेल्या नातेवाइकांना देण्यासाठी फराळ पाठविण्याची लगीनघाई कुटुंबांमध्ये सुरू झाली आहे. टपाल खातेदेखील आत्ता त्या देशांचे सर्व नियम पाळून पार्सल सुविधा देण्यासाठी सज्ज आहेत.
यंदा दिवाळी फराळ परदेशात पाठवण्याचे प्रमाण घटले -
दिवाळीसाठी चकल्या, करंज्या, अनारसे, बेसन, रवा, मोतीचूर लाडू, चिवडा, ड्रायफूट्स अशा पदार्थांसह खास पारंपरिक कपडे, लहान मुलांसाठी खेळणी परदेशात पाठविली जात आहेत. यात घरगुती पदार्थांवरोबरच रेडिमेड पदार्थांवर भर देण्यात आला आहे. दरवर्षी 200 टन दिवाळी फराळ परदेशात पाठविला जातो. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत परदेशात फराळ पाठविण्याचे प्रमाण यंदा कमी असल्याचे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा - लक्ष्मी पुजनानिमित्त आज शेअर बाजारात विशेष ट्रेडिंग, जाणून घ्या माहिती
पोस्टाची 82 देशांमध्ये सेवा -
टपाल कार्यालयात परदेशात फराळासह विविध वस्तू पाठविण्यासाठीचा पार्सल विभाग आम्ही कार्यान्वित केला आहे. आम्ही जगभरातील 82 विविध देशांमध्ये पार्सल सेवा देत आहोत. त्यासाठी पाच विविध साईजमध्ये बॉक्सेस उपलब्ध कर देण्यात आले आहेत. फराळ पॅकिंग करून त्याला लोगो लाव जात आहे, अशी माहिती असिस्टंट पोस्टर मास्तर नरेंद्र लागवणकर यांनी दिली.
दरम्यान, संपूर्ण देशात दिवाळीपर्वाच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या देशातील अनेक मान्यवरांनी देशवासियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावर्षीदेखील भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरा केली आहे. आज त्यांनी राजस्थानच्या जैसलमेर येथील जवानांसोबत दिवाळी साजरा केली.