पुणे: पुण्यामध्ये कसबा आणि पिंपरीचिंचवड या दोन विधानसभा पोटनिवडणूक होत आहेत. दोन्ही ठिकाणी भाजपाचे आमदार असल्यामुळे, हा परंपरागत आमचा मतदारसंघ असल्याचा भाजपकडून दावा करण्यात येत आहे. भाजपामध्ये इच्छुक लोकांची संख्या जास्त असल्याने भाजपाकडूनही आणखी उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. याच ठिकाणी महाविकास आघाडीकडून कोण लढणार ते आणखी ठरले नाही. तीन वेगवेगळे पक्ष म्हणजे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस हे या मतदारसंघावर लढण्याचा दावा करत आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही. परंतु यामध्ये कुणाला तिकीट भेटणार, मतदारसंघ कोणाला सुटणार, हे माहीत नसतानाच या मधलाच एक पक्ष बहुजन आघाडी सुद्धा आम्ही येथे जर शिवसेना नसेल तर आम्ही निवडणूक लढवण्यासाठी तयार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
निवडणूक लढवतील का?: वंचित बहुजन विकास आघाडीकडून चार नावे पक्ष सृष्टीकडे पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे आता प्रकाश आंबेडकर, हे जर शिवसेना लढली नाही आणि जर येथे महाविक आघाडी, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला जागा सुटली. तर कार्यकर्त्यांचा हा जो निर्णय आहे तो त्यांना मान्य असेल का? आणि ते निवडणूक लढवतील का? हे पाहणे महत्त्वाचे आहे. परंतु कार्यकर्त्यांनी मात्र आम्ही पक्षाकडे इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती दिली आहे.
प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेतील: एकीकडे वंचित बहुजन विकास आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये या दोन्ही जागा शिवसेना लढेल आणि तिथे वंचितचा पाठिंबा असेल असे सांगिते होते. तरही कार्यकर्त्यानी या ठिकाणी या भावना व्यक्त केल्याने महाविकास आघाडीमध्येच आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर आता प्रकाश आंबेडकर काय निर्णय घेतात याची उत्सुकता लागली आहे. परंतु या ठिकाणी सगळे उमेदवार जाहीर झाल्यानंतरच किंवा उमेदवारी भरण्याच्या शेवटच्या दिवशीच निश्चित कोण लढेल हे निश्चित होणार आहे. हा सस्पेन्स सर्वच पक्षांकडून वाढवण्यात येत आहे.