ETV Bharat / state

शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅनला अपघात; दोन जण जखमी - शरद पवार लेटेस्ट न्यूज

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या वाहनांच्या ताफ्यासह आज सकाळी मुंबईच्या दिशेने जात होते. तेव्हा, ताफ्यातील एक पोलीस व्हॅन अचानक पलटी झाली. या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.

Police van accident in Sharad Pawars convoy
शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅन अपघात
author img

By

Published : Jun 29, 2020, 12:59 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅनचा मुंबई-पुणे द्रुतगतिमार्गावर अपघात झाला. यात दोघे जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर शरद पवार यांनी स्वतः जखमींची विचारपूस केली आहे. हा अपघात आज सकाळी साडेदहाच्या सुमारास अमृतांजन पुलाखाली झाला.

शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅन अपघात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या ताफ्यासह आज सकाळी मुंबईच्या दिशेने जात होते. तेव्हा, ताफ्यातील (MH- 12 NU- 5881) ही पोलीस व्हॅन अचानक पलटी झाली. या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले असून शरद पवार मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.