ETV Bharat / state

एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये - अजित पवार - ३१ जानेवारी लसीकरण

उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हास्तरीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये

author img

By

Published : Jan 31, 2021, 10:59 AM IST

बारामती (पुणे) - आज देशभरात पोलीस लसीकरणाची मोहीम राबविली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमधील महिला रुग्णालयात पाच वर्षाच्या आतील बालकांना पोलीस लस पाजून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. आजच्या या मोहिमेत एकही बालक लसीकरणापसून वंचित राहू नये, असे आवाहन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये
11 लाख 32 हजार 351 बालकांना पोलिओ लसीकरणाचे उद्दिष्ट्यपुणे जिल्हयात मोहिमेत सुमारे 11 लाख 32 हजार 351 बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यानुसार आज जिल्ह्यात 6 हजार 700 बुथवर लसीकरण करण्यात येत आहे. 6 हजार 254 टीमच्या मदतीने गृहभेटी देत लसीकरण करण्यात येणार आहेत. आज अजित पवार यांच्या हस्ते जिल्ह्यास्तरीय मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती नीता बारवकर, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ.चेतन खाडे, डॉ. शिंपी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील, बारामती रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. सदानंद काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे आदी यावेळी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.