ETV Bharat / state

चाकणमधील 27 लाखांच्या दरोड्यात पोलीसच मास्टरमाईंड, फरार उपनिरीक्षक निलंबित

author img

By

Published : Oct 9, 2020, 6:56 PM IST

पोलीस आयुक्तालयातील चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 27 लाखांचा दरोडा पडला असून यात पोलीस उपनिरीक्षकाचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. या पोलिसाला पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तत्काळ निलंबित केले आहे. पोलीस उपनिरीक्षक विक्रम चंद्रकांत पासलकर असे त्याचे नाव असून गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार आहे. त्याचा शोध घेतला जात आहे.

पोलीस उपनिरीक्षक विक्रम चंद्रकांत पासलकर दरोडा

पिंपरी-चिंचवड (पुणे) - चाकणमध्ये पोलिसानेच 27 लाखांचा दरोडा घातल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. पोलीस आयुक्तालयातील चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 21 सप्टेंबरच्या रात्री 27 लाखांचा दरोडा पडला होता. यात पोलीस उपनिरीक्षकाचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. या पोलिसाला पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी तत्काळ निलंबित केले आहे. खाकी वर्दीला काळिमा फासणारी ही घटना असून दरोड्याचा कट आरोपी पोलीस उपनिरीक्षक विक्रम चंद्रकांत पासलकर याने रचल्याचं पोलीस तपासात समोर आल्याची माहिती पिंपरी-चिंचवड गुन्हे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली आहे.

चाकणमध्ये पोलिसानेच घातला 27 लाखांचा दरोडा

हेही वाचा - मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी काढा; संभाजी ब्रिगेडचे नांदेड-हैदराबाद रस्त्यावर रास्तारोको..

गुन्हा दाखल झाल्यापासून पोलीस उपनिरीक्षक विक्रम चंद्रकांत पासलकर फरार असून त्याचा शोध घेतला जात आहे. या घटनेप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून विनोद ठाकरे (वय 28), जितेंद्र रामभवन श्रीवास (वय 30), रियाज अमीन इनामदार (वय 24) अशी त्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर महिन्यात शेवटच्या आठवड्यात चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 27 लाखांचे वाहनांचे सुटे पार्ट घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाला चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आले होते. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू होता. तेव्हा, या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली असून या दरोड्याचा मास्टरमाईंड हे पोलीस उपनिरीक्षक विक्रम चंद्रकांत पासलकर असल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. त्यानुसार, त्यांच्यावर गुन्हा दाखल करून तत्काळ त्यांचे निलंबन करण्यात आले आहे.

या घटनेमध्ये आणखी काही मोठ्या अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे नाकारता येत नाही. त्या दिशेने तपास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त यांनी सांगितले आहे. एकीकडे कोविड योद्धे म्हणून दिवसरात्र कर्तव्य बजवणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यामुळे प्रतिष्ठा उंचावत असताना काही पोलीस कर्मचाऱ्यामुळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन होत असल्याचे या घटनेवरून दिसत आहे.

हेही वाचा - सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर लातूर-मुंबई रेल्वेला ग्रीन सिग्नल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.