ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये 11 लाखांचा गुटखा जप्त; एकावर गुन्हा दाखल

पिंपरी चिंचवडच्या सांगवी भागात सामाजिक सुरक्षा पथकाने गुटख्याच्या गोदामावर छापा टाकला. या कारवाईत तब्बल 11 लाख 27 हजारांचा गुटखा साठा आणि अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

police-seized-gutkha-in-pimri-chinchwad-pune
गुटखा
author img

By

Published : Dec 7, 2020, 9:04 AM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - पोलीस आयुक्तालयातील सामाजिक सुरक्षा पथकाने सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गुटखा विक्री करणाऱ्या एका व्यक्तीच्या गोदामावर छापा टाकला आहे. यात तब्बल 11 लाख 27 हजारांचा गुटखा साठा आणि अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात अशोक नाराराम चौधरी (वय -45, रा. विशालनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुटख्याच्या गोदमावर पोलिसांचा छापा -

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विशालनगर येथील एका गोदामात गुटख्याचा साठा असल्याची माहिती खबऱ्यामार्फत सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली होती. त्यानुसार या पथकाने विशाल नगर येथील अशोक चौधरी याच्या गोदामावर छापा टाकला. त्यावेळी तेथे मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा केला असल्याचे पथकाच्या निदर्शनास आले.

पिंपरी-चिंचवडमध्ये 11 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला..
जप्त करण्यात आलेला मुद्देमाल -

या कारवाईत पोलिसांनी 4 लाखांचा पान मसाला, 2 लाख 68 हजार रुपये किमतीचा तंबाखू मसाला, तसेच तंबाखू, सुगंधित पानमसाला, गाडी, मोबाईल आणि रोकड जप्त केले आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई -
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक धैर्यशिल सोळंके, विजय कांबळे, सुनिल सिरसाट, नितीन लोंढे, भगवंत मुळे, अनिल महाजन, अमोल शिद, मारुती करचुडे, राजेश कोकाटे, गणेश कारोटे, वैष्णवी गावडे, योगेश तिडके आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा - पैशांसाठी पतीचे अपहरण करणाऱ्या पत्नीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, असा रचला कट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.