ETV Bharat / state

नवीन कारची धुमधडाक्यात पूजा अन् पोलिसांनी केली गुन्ह्याची नोंद - pune latest live news

कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील वाईनशॉप मालक कृष्णा रोहिदास ढेरंगे यांनी नुकतीच नवीन फॉरच्युनर कार घेतली. सध्या लॉकडाऊन तसेच गर्दी करण्यास बंदी असताना देखील त्यांनी सदर कारचे धुमधडाक्यात गर्दी करून कारचे पूजन केले. त्यांनतर कोरेगाव भीमा तलाठी जयमंगल धुरंदर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने या गाडी मालकासह दहा जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

police registered a case against car owner in shikrapur pune
नवीन कारची धुमधडाक्यात पूजा केली अन् पोलिसांनी केली गुन्ह्याची नोंद
author img

By

Published : May 26, 2021, 9:40 AM IST

कोरेगाव भीमा (पुणे) - शिरूर तालुक्याच्या कोरेगाव भीमा येथे एका वाईनशॉप मालकाने महागडी नवीन कार घेतली. या कारची मोठ्या धुमधडाक्यात पूजा केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कार मालक कृष्णा रोहिदास ढेरंगे यांच्यासह दहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

नेमके प्रकरण काय आहे -

कोरेगाव भीमा ता. शिरुर येथील वाईनशॉप मालक कृष्णा रोहिदास ढेरंगे यांनी नुकतीच महागडी नवीन कार घेतली. सध्या लॉकडाऊन तसेच गर्दी करण्यास बंदी असताना देखील त्यांनी सदर कारचे धुमधडाक्यात गर्दी करून कारचे पूजन केले. तर यावेळी अनेकांनी तोंडावर मास्क लावलेले नव्हते तर गर्दी देखील केलेली होती. कारची पूजा झाल्यानंतर सदर पूजेचे फोटो सोशल मिडीयावर प्रसारित झाले. त्यांनतर कोरेगाव भीमा तलाठी जयमंगल धुरंदर यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने गाडी मालकासह दहा जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दहा जणांवर गुन्हे दाखल -

शिक्रापूर पोलिसांनी कृष्णा रोहिदास ढेरंगे, राम रोहिदास ढेरंगे, प्रदीप कैलास ढेरंगे, दिपक संजय लटके सर्व रा. ढेरंगेवस्ती कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे, मच्छिंद्र पर्वतराव ढगे रा. आपटी ता. शिरुर जि. पुणे यांच्यासह अनोळखी दहा जणांवर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात हे करत आहे.

हेही वाचा - 12 वीची सीबीएसई परीक्षा रद्द करा- 300 विद्यार्थ्यांचे सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना पत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.