ETV Bharat / state

वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड - criminal expose to disgrace pimpri

नेहरूनगर परिसरात वाहनांची तोडफोड करत दहशत पसरवणाऱ्या आरोपींची पिंपरी पोलिसांनी धिंड काढली आहे.

वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड

author img

By

Published : Nov 3, 2020, 10:20 PM IST

पुणे- वाकड आणि नेहरूनगर परिसरात टोळक्याने वाहनांची तोडफोड करत दहशत पसरवली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर वाकड पोलिसांनी बेड्या घालून आरोपींची धिंड काढली होती. त्यापाठोपाठ पिंपरी पोलिसांनीही आरोपींची धिंड काढली आहे.

माहिती देताना गुन्हे पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे

तोडफोड प्रकरणी आशिष जगधने (वय ३१), इरफान शेख (वय ३०), जितेश मुंजळे (वय २८), जावेद औटी (वय २९), आकाश हजारे (वय ३०) यांच्यासह २० जणांना अटक करण्यात आली आहे. तर १४ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींसह १०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश सुभाष जाधव (वय ३५, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अटक केलेल्या आरोपींपैकी ५ जणांची पिंपरी पोलिसांनी धिंड काढली. आरोपींना बेड्या ठोकून पोलिसांनी त्यांना घटनास्थळी नेले. पोलिसांनी या घटनेत १७ वाहने जप्त केली आहेत. दरम्यान, धिंड काढल्याप्रकरणी घटनास्थळ परिसरात वाहन जात नसल्याने आरोपींना पायी नेल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे. वाकड पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या आरोपींची धिंड काढल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पिंपरी पोलिसांनी नेहरूनगर परिसरात तोडफोड करणाऱ्यांची धिंड काढली असून यामुळे परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

हेही वाचा- आता गिर्यारोहणही होतेय 'अनलॉक'; पुणे जिल्ह्यात सशर्त परवानगी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.