ETV Bharat / state

बारामती : इंदापुरात कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; लाखाेंचा मुद्देमाल जप्त - बारामती गुन्हे वार्ता

इंदापुरातील कत्तलखान्यावर पोलिसांना छापा टाकत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.

police raid animal slaughter house in indapur
बारामती : इंदापुरात कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; साडे दहा लाखांचा मुद्देमाल जप्त
author img

By

Published : Dec 5, 2020, 10:46 PM IST

बारामती - इंदापूर शहरातील कुरेशी गल्ली येथील कत्तलखान्यावर इंदापूर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी ३० लहान वासरे, ७ गाई, ७०० किलो गोमांस असा साडे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या कारवाईत इंदापूर पोलिसांनी आक्रम रशिद कुरेशी (१९), तोफिक निसार मुलानी (२८), अलीम खय्युम कुरेशी (३२) तिघेही रा.कुरेशी गल्ली यांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत इंदापूर पोलिसांनी कत्तलीसाठी आणलेल्या जनावरांसह १ पांढऱ्या रंगाची महिंद्रा पिकप (एम.एच. ४२ एल.टी. ६५७४), एक विटकरी रंगाचा आयशर टेम्पो ( एम.एच. ४२ बी. ७५२७), पांढऱ्या रंगाची बोलोरो पिकप (एम. एच. ४२ एम. ४६२९), पांढऱ्या रंगाची बोलोरो पिकप (एम.एच. ४८ टी.८६९६), १ पल्सर (एम.एच ४२ ए डब्ल्यू ३०८२) यासह आदी मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

हेही वाचा - महापरिनिर्वाण दिन : सकाळी चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेबांना शासकीय सलामी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.