पुणे - पंचवीस दिवसानंतर कोरोनातूनमुक्त झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुष्पवर्षाव करीत त्याचे स्वागत केले. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या सचिन खुटे यांना 24 एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्यांना लवळे येथील सिम्बॉयोसीस महाविद्यालयात तयार करण्यात आलेल्या आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर झालेल्या यशस्वी उपचारानंतर आज ते कोरोनामुक्त झाले. यावेळी डिस्चार्ज देताना पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या सर्वांनी सचिन खुटे यांच्यावर पुष्पवर्षाव करीत त्यांचे स्वागत केले.
पुण्यात आतापर्यंत साडेतीन हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. पुणे पोलीस दलातील 25 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यातील 13 कर्मचाऱ्यांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 12 कर्मचाऱ्यांवर अद्यापही उपचार सुरू आहेत. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या दिलीप लोंढे या पोलीस कर्मचाऱ्याचा काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळे उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.
![pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-korona-discharge-pune-police_20052020183505_2005f_1589979905_313.jpg)