पुणे - जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या शौर्य दिनानिमित्त सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर आज पुणे ग्रामीण पोलिसांकडून आज शिक्रापूर येथील एसटी स्टँड परिसरात बाँम्ब निकामी करण्याची रंगीत तालीम करण्यात आली आहे.
1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे शौर्यदिन साजरा होणार आहे. त्यावेळी परिसरात समाजकंटकांकडून घातपाताचा कट रचला गेला, तर पुणे ग्रामीण पोलीस तो हाणून पाडण्यासाठी सज्ज असल्याचे या मॉक ड्रिलमधून दाखविण्यात आले. आजच्या (दि. 24 डिसें) शिक्रापूर येथील एसटी स्टँड परिसरातील मॉकड्रिल करण्यात आले.
हेही वाचा - राघोबादादा जरा आनंदीबाईला आवरा.. महिला शिवसैनिकांनी अमृता फडणवीसांच्या फोटोला मारले जोडे
वर्षापूर्वी कोरेगाव भीमा येथे शौर्यदिनाच्या दिवशी झालेल्या हिंसक दंगलीचे संपूर्ण देशात पडसात उमटले होते. त्यामुळे या वर्षी कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ येथे शौर्यदिन साजरा होत असताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे.
हेही वाचा - कोरेगाव भीमा प्रकरणी गुन्हे दाखल असणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई