पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात दहशत घालणाऱ्या आक्या बॉण्ड टोळीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. या कुख्यात टोळीवर आत्तापर्यंत 18 गंभीर गुन्हे दाखल आहे. आकाश ऊर्फ सुमित ऊर्फ आक्या बॉण्ड पांडुरंग मोहोळ (वय-19), विकास ऊर्फ पांग्या धोंडीराम जाधव (वय-22), शोएब इजराईल शेख (वय-19), विशाल रामधन खरात (वय-20) यांच्यासह दोन अल्पवयीन साथीदार अशी कारवाई केलेल्या आरोपींची नावे आहेत, अशी माहिती चिखली पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सराईत गुन्हेगार विकास ऊर्फ पांग्या धोंडीराम जाधव आणि आक्या बॉन्ड यांच्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या मार्फत तयार करून पाठविला.
आरोपींनी संघटीतपणे एकूण 18 गंभीर गुन्हे केले आहेत. त्यांच्या विरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 अंतर्गत कारवाई करण्यासाठी प्रस्ताव तयार केला. पी.सी.बी. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे यांनी प्रस्तावातील कागदपत्रांची छाननी करून प्रस्ताव तयार केला. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक सतीश माने, राजकुमार शिंदे, गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार सचिन चव्हाण, दत्ता कदम यांच्या पथकाने केली.
पिंपरी-चिंचवडमध्ये दहशत माजवणाऱ्या कुख्यात आक्या बॉण्ड टोळीवर 'मोक्का' - पिंपरी-चिंचवड आक्या बॉण्ड टोळीवर पोलिसांची मोक्का कारवाई
सराईत गुन्हेगार विकास ऊर्फ पांग्या धोंडीराम जाधव आणि आक्या बॉन्ड यांच्या टोळीवर मोका अंतर्गत कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांच्या मार्फत तयार करून पाठविला.