ETV Bharat / state

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : नातेवाईक आणि मित्रांचे जबाब घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना - puja chavan suicide case news

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचेही नाव घेतले जाते. पूजा चव्हाण हिचा मृत्यू होऊन आज आठ दिवस पूर्ण झाले आहे.

puja chavan
पूजा चव्हाण
author img

By

Published : Feb 15, 2021, 8:36 PM IST

पुणे - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राजकीय वातावरण तापू लागले आहे. राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पुणे पोलिसांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. पूजा चव्हाण हिचे नातेवाईक आणि मित्रांचे जबाब घेण्यासाठी पुणे पोलिसांचे एक पथक तिच्या मूळगावी गेल्याची माहिती आहे. पूजाच्या वडिलांनी यापूर्वीच आपली कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे सांगितले होते. तर तिच्या इतर नातेवाईकांचे ही काहीसे असेच म्हणणे होते. मात्र, या प्रकरणात राजकीय घडामोडी होत असल्याने पुणे पोलिसांकडून हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचेही नाव घेतले जाते. पूजा चव्हाण हिचा मृत्यू होऊन आज आठ दिवस पूर्ण झाले आहे. मात्र, या प्रकरणी कुणीही तक्रार न दिल्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड हे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

हेही वाचा - विरोधकांच्या बोलण्यात तथ्य नाही, चौकशीतून सत्य पुढे येईल - गृहमंत्री अनिल देशमुख

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात दररोज नवीन खुलासे उघडकीस येत आहेत. या प्रकरणात आणखी एक नवीन खुलासा समोर आला आहे. पूजाने आत्महत्या केली नाही तर ती चक्कर येऊन पडली, असा जबाब पूजासोबत असलेल्या दोघांनी दिल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय पूजा राहत असलेल्या घरांमध्ये पोलिसांना दारूच्या बाटल्या ही सापडल्याची माहिती मिळत आहे. वानवडी पोलिसांनी पूजा सोबत राहणाऱ्या अरुण राठोड आणि विलास चव्हाण यांचा जबाब नोंदवला आहे. त्यातून ही नवीन माहिती समोर आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे या प्रकरणाला नवे मिळण्याची शक्यता निर्माण झाली.

दरम्यान, मागील दोन दिवसांपासून पुणे पोलिसांचे एक पथक पूजा चव्हाण हिचे नातेवाईक आणि मित्रांचे जबाब घेण्यासाठी गेले आहेत. पुजाचे आई-वडील, बहीण, नातेवाईक आणि मित्रांचे जबाब नोंदविण्यासाठी गेले आहेत. हे पथक अद्याप पुण्यात परत आले नाही. हे पथक परत आल्यानंतर पुढील कारवाई होण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.