ETV Bharat / state

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाचा अहवाल पोलिसांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे सोपवला - पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणा बद्दल बातमी

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाचा अहवाल पोलिसांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे सोपवला आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे पोलिसांना पत्र पाठवून या घटनेचा अहवाल देण्याचे आदेश दिले होते.

Police handed over the report of Pooja Chavan's death to the National Commission for Women
पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणाचा अहवाल पोलिसांनी राष्ट्रीय महिला आयोगाकडे सोपवला
author img

By

Published : Feb 16, 2021, 6:27 PM IST

पुणे - वानवडी परिसरात सात फेब्रुवारीला पूजा चव्हाण या अवघ्या बावीस वर्षाच्या तरुणीचा इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाला होता. दरम्यान पूजाने आत्महत्या केली कीतीचा खून झाला अशा शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. या प्रकरणात शिवसेनेच्या एका मंत्र्यांचे नाव समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाला राजकीय वळण लागले. यानंतर राष्ट्रीय महिला आयोगानेही या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे पोलिसांना पत्र पाठवून या घटनेचा अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी आज अखेर आतापर्यंतच्या संपूर्ण तपासाचा अहवाल राष्ट्रीय महिला आयोग आणि पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यामुळे आता राष्ट्रीय महिला आयोग याप्रकरणी नेमकी काय भूमिका घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राजकीय वातावरण तापू लागल्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांनी पुणे पोलिसांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पुणे पोलीस कामाला लागले आहेत. पूजा चव्हाणच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यासाठी पुणे पोलिसांचे पथक गेले आहे.

दरम्यान भाजपच्या नेत्यांनी पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड जबाबदार असल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, पूजाच्या मृत्यूला आठ दिवस झाल्यानंतरही या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई झाले नाही. या प्रकरणी कुणीही तक्रार न दिल्यामुळे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड हे या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.