ETV Bharat / state

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना रडू कोसळत - पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आंच्याबद्दल बातमी

पोलीस आयुक्त कृष्ण प्राकश यांना रडू कोसळ्याचे पहायला मिळाले. एका तरुणीने त्यांच्या समोर वडिलांच्या विरहात ही कविता सादर केल्यानंतर हा क्षण घडला.

Police Commissioner Krishna Prakash became emotional after hearing the poem
पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना रडू कोसळत
author img

By

Published : Jan 25, 2021, 8:00 PM IST

Updated : Jan 25, 2021, 8:24 PM IST

पुणे - वडिलांच्या विराहात एका तरुणीने पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या समोर एक कविता सादर केली. कविता ऐकताच आयर्नमॅन अशी ओळख असलेले कृष्ण प्रकाश भावूक झाले, त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले. यावेळी उपस्थित असणारे अधिकारी देखील भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना रडू कोसळत

ऋतुजाने कविता येकवताच पोलीस आयुक्तांना अश्रू झाले अनावर -

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस कृष्ण प्रकाश यांच्या दालनात ऋतुजा शांतीलाल पाटील (रा. पळशी, माण, सातारा) असे कविता सादर केलेल्या मुलीचे नाव आहे. ऋतुजा लहान असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर तिने आयुष्यात आलेले सर्व अनुभव 'झुळूक' पुस्तकात मांडले आहेत. तसेच, तिने 'देवा घराचा बाबा' या कवितेतून आपल्या भावनांना वाट करून दिली आहे.

पोलीस आयुक्तांच दालन काही मिनिट होते स्तब्ध -

कवितेचे शब्द कानावर पडताच पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश भावनिक झाले. नेहमी, आयर्नमॅन म्हणून ओळखले जाणाऱ्या पोलीस आयुक्तांना रडू कोसळले, त्यांना अश्रू अनावर झाले. उपस्थित असलेले अधिकारी देखील कविता ऐकताच काही क्षण स्तब्ध राहिले, त्यांचे मन ही दाटून आले.

Last Updated : Jan 25, 2021, 8:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.