ETV Bharat / state

IPS Krishna Prakash : पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची धडाकेबाज कारवाई.. वेषांतर करून खंडणीखोरांच्या मुसक्या आवळल्या

कामाच्या अनोख्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ( Police Commissioner Krishna Prakash ) यांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत खंडणीखोरांच्या मुसक्या आवळल्या ( Extortion In Pimpari Chinchwad ) आहेत. पोलीस अधिकाऱ्यांचं नाव सांगून हा भामटा खंडणी उकळत ( Extortion For Police ) होता. कारवाई जरी चांगली असली तरी, स्वतः आयुक्तांना कारवाई करावी लागल्याने हे पिंपरी चिंचवड पोलिसांचे अपयश असल्याची चर्चा ( Ransom Seeker Arrested ) आहे.

पोलीस आयुक्तांनी वेषांतर करत आरोपीला ठोकल्या बेड्या

author img

By

Published : Mar 27, 2022, 3:05 PM IST

पिंपरी-चिंचवड ( पुणे ) : सर्वसामान्य नागरिकांकडून खंडणी उकळणाऱ्या ( Extortion In Pimpari Chinchwad ) एका भामट्याला चक्क पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश ( Police Commissioner Krishna Prakash ) यांनी वेषांतर करून जेरबंद ( Ransom Seeker Arrested ) केलंय. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि मुंबई पोलीस दलातील विश्वास नांगरे पाटील ( IPS Vishwas Nangare Patil ) यांचा विश्वासू असल्याचं सांगून तो नागरिकांना खंडणी मागत ( Extortion For Police ) होता. याप्रकरणी रोशन बागुल, गायत्री बागुल, पूजा माने, ज्ञानेश्वर, अजित हाके अशी सर्व आरोपींची नाव असून, पैकी तिघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.

प्रसारमाध्यमांना घेऊन कारवाई : नेहमीच चर्चेत असणारे पोलीस आयुक्त गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्धी आणि पत्रकार परिषदापासून लांब होते. परंतु, एका ऑडिओ क्लिपवरून खंडणी मागणाऱ्या आरोपीला वेषांतर करून पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश बेड्या ठोकल्या. यामुळं पुन्हा एकदा पोलीस आयुक्तांची चर्चा रंगली आहे. मात्र, प्रसारमाध्यमांना घेऊन अशी कारवाई करणे कितपत योग्य आहे? खंडणी मागणाऱ्या आरोपीला पकडण्यासाठी पोलीस आयुक्तांना स्वतः कारवाई करावी लागतेय हे पिंपरी पोलिसांच अपयश तर नाही ना असे अनेक प्रश उपस्थित होत आहेत.

अन् आरोपीला पकडले : शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास एका हॉटेलमधून रोशन बागुल या खंडणीखोर आरोपीला पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी वेषांतर करून बेड्या ठोकल्यात. संबंधित आरोपी हा कृष्ण प्रकाश आणि विश्वास नांगरे पाटील यांचा विश्वासू असल्याचं सांगत, आम्ही त्यांचे अनेक जमिनीचे प्रकरण निकाली लावली आहेत. अस तो म्हणायचा. स्वतः ला सायबर क्राईमचा अधिकारी देखील म्हणवत असे. अस धमकावून तो सर्वसामान्य नागरिकांकडून खंडणी उकळायचा. शनिवारी रात्री फिर्यादी विसेन्ट जोसेफ यांनी पैसे घेण्यास आरोपीला बोलावले होते. तेव्हा, वेषांतर केलेल्या कृष्ण प्रकाश यांनी आरोपीला रंगे हाथ पकडले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.