ETV Bharat / state

देहुगावामध्ये किरकोळ कारणावरून तरुणाचा खून; तीन आरोपींना अटक

author img

By

Published : May 19, 2020, 4:53 PM IST

Updated : May 19, 2020, 7:14 PM IST

पुण्यातील देहूगाव येथील इंद्रायणी नदीपात्रात मृतदेह सापडला होता. त्याचा खून झाला असून पोलिसांनी अनिकेत ऊर्फ टायगर बाबुराव शिंदे (वय-१९), पवन किसन बोरोले (वय-२६), महेंद्र विजय माने (वय-३८) या तीन आरोपींना अटक केली असून एक जण अद्यापही फरार आहे.

pune rural crime news  dehugaon youth murder  dehugaon pune latest news  देहूगाव तरुणाचा खून  देहूगाव पुणे लेटेस्ट क्राईम न्युज  देहूगाव पुणे लेटेस्ट न्युज
देहुगावामध्ये किरकोळ कारणावरून तरुणाचा खून; तीन आरोपींना अटक

पुणे - जिल्ह्यातील देहूगाव येथील इंद्रायणी नदी पात्रात ज्या तरुणाचा मृतदेह आढळला त्याचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींनी अटक केली असून चौथा आरोपी फरार आहे. दारू प्यायल्यानंतर वाद झाल्यामुळे त्या तरुणाचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

सुनिल रामराव मरजकोले (३५), असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचा मृतदेह इंद्रायणी नदी पात्रात हातपाय बांधलेला अवस्थेत आढळला होता. त्यावेळी देहूरोड पोलीस खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध घेत होते. सुनील कुठे राहत होता? याबाबत पोलीस चौकशी करत असताना टायगर, पवन, महेंद्रसह आणखी एक व्यक्ती सुनीलसोबत राहत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अनिकेत ऊर्फ टायगर बाबुराव शिंदे (वय-१९), पवन किसन बोरोले (वय-२६), महेंद्र विजय माने (वय-३८) या तिघांना सांगुर्डी फाटा येथून ताब्यात घेतले, तर चौथा आरोपी सचिन फरार झाला. त्यानंतर त्यांची सखोल चौकशी केली असता टायगरने गुन्ह्याची कबुली दिली, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी सांगितले.

असा केला खून -

सर्वजण दारू प्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये भांडण झाले. त्यानंतर टायगर, महेंद्र, पवन आणि अन्य एका आरोपीने सुनीलला लाथा, बुक्क्यांनी तोंडावर मारहणार केली. तसेच त्याच्या डोक्यात दगड मारला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृत सुनीलचे हातपायाला दगड बांधून इंद्रायणी नदी पात्रात फेकून दिले, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, ही कामगिरी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, पोलीस कर्मचारी धनराज किरनाळे, दत्तात्रय बनसुडे, मयुर वाडकर यांनी केली.

Last Updated : May 19, 2020, 7:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.