पुणे - पंजाब नॅशनल बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणांविरोधात बँकेच्या ऑफिस असोसिएशनच्यावतीने 24 व 25 जूनला दोन दिवसीय संपाची घोषणा करण्यात आली आहे. यासंदर्भात ऑल इंडिया पंजाब नॅशनल बँक ऑफिसर असोसिएशनचे कोषाध्यक्ष कॉ. विलियम तुस्कानो यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.
तुस्कानो म्हणाले, 10 जून 2019 पासून आम्ही सर्वजण असहकार चळवळ सुरू करणार आहोत. ज्यामध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचारी केवळ कामाच्या वेळेत आणि कामाच्या वेळी आलेल्या संदेशांवरच कार्य करतील. त्यानंतर आलेल्या संदेशांना आम्ही उत्तर देणार नाही.
आम्ही 1 जूनला बँकेकडून अतिरिक्त मदत मागे घेणार आहोत. तर 11 जूनपासून हे काम बंद करण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच 17 जूनला देशातील बँकेच्या सर्व शाखांसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.