ETV Bharat / state

नमो फाऊंडेशनच्यावतीने पुण्यात बांधण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर

पुण्यातील औंधमध्ये चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधण्यात आले आहे. नमो फाऊंडेशनचे मयूर मुंडे यांच्या संकल्पनेतून हे मंदिर बांधण्यात आले आहे.

pm narendra modis temple in pune
pm narendra modis temple in pune
author img

By

Published : Aug 16, 2021, 10:34 PM IST

पुणे - पुणे शहर हे अनेक मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. तिथे विविध प्रकारचे पेशवेकालीन मंदिर आपल्याला बघायला मिळतात. पण आता पुण्यातील औंधमध्ये चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधण्यात आले आहे. नमो फाऊंडेशनचे मयूर मुंडे यांच्या संकल्पनेतून हे मंदिर बांधण्यात आले आहे.

नरेंद्र मोदींचे मंदिर

'मोदींचे व्यक्तिमत्व सर्वांना भावते' -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व प्रत्येकालाच प्रेरणादायी आहे, अशा व्यक्तिमत्त्वाचे मंदिर नक्कीच समाजातील व्यक्तीला प्रेरणा देणारे आहे. समाजात राहताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. या भावनेतून आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर बांधावे, असे मला वाटले, अशी प्रतिक्रिया मयूर मुंडे यांनी दिली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी देशासाठी जे काही करत आहेत, ते खरच कौतुकास्पद आहे. त्यामुळे अशा महापुरुषांचे शिल्प का उभारले जाऊ नये, अशी भावना नागरिकांची आहे. त्यांचे व्यक्तिमत्व सर्वांना भावते. ते भारताचे खरे हिरो आहेत, अशी नागरिकांची भावना असल्याचेही ते म्हणाले.

तर चेन्नईच्या त्रिचीमध्ये एका शेतकऱ्यानेही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर बांधले होते. या शेतकऱ्याने आपल्या स्वत:च्या पैशाने हे मंदिर तयार केले होते. ज्या जमिनीवर शेतकऱ्याने हे मंदिर तयार केले. ती जमिनही शेतकऱ्याची होती.

हेही वाचा- अल्पवयीन मुला-मुलींना मॉलमध्ये प्रवेशासाठी आता आहेत 'हे' नियम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.