पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. जगतगुरू संत तुकाराम महाराज यांची मूर्ती आणि शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. यासाठी काही दिवसांपूर्वी देहू संस्थानाच्या विश्वस्तांनी पंतप्रधानांना देहूत येण्याचे आमंत्रण दिले होते. ते त्यांनी स्वीकारले असून, आज ते देहूत येणार आहे. मंदिर प्रशासनाच्या वतीने पंतप्रधान मोदी ( Pm Modi will do puja at Dehu ) यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. तुकाराम महाराज मुख्य मंदिरामध्ये वारकरी भागवत पताका स्तंभ उभारण्यात आला आहे. या स्तंभावर 10 बाय 15 फूट वारकरी ध्वज असणार आहे. त्याचे ध्वजारोहण ( Warkari Bhagwat flag tukaram maharaj temple dehu ) व पूजन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे.
हेही वाचा - देहूत पालखी रथाला मुस्लिम कारागीर देताहेत चकाकी
या स्तंभाची उंची 61 फूट असून 8 इंचाचा व्यास आहे. स्तंभाचे फाउंडेशन 10 फूट खोल घेण्यात आले आहे. हा ध्वज पूर्णपणे 6 एमएम स्टील कोटिंगमध्ये व अत्याधुनिक पद्धतीमध्ये तयार करण्यात आला असून यावर वातावरणाचा दीडशे वर्षांपर्यंत कोणताही परिणाम होणार नाही. ही पताका 10 बाय 15 फुटाची असणार आहे. ही पताका लावण्यासाठी अथवा काढण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला स्तंभावर चढण्याची आवश्यकता नसून वैशिष्ट्यपूर्ण अत्याधुनिक पद्धतीने पताका वर चढविणे अथवा उतरविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
देहूत पोलिसांचा चोख बंदोबस्त, तीन किलोमिटर पर्यंत बॅरिकेट्स - काही तासातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथील शिळा मंदिर आणि जगतगुरु संत तुकोबांच्या मूर्तीचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी हे सभा मंडपातून वारकरी संप्रदायाला संबोधित करणार आहेत. सभास्थळी 30 - 40 हजार नागरिक बसतील, अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. ज्या रस्त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला तीन किलोमिटर पर्यंत बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.
डॉग स्कॉडही जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या मंदिरासमोर नतमस्तक - जगतगुरु संत तुकाराम महाराज आणि शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. देहूतील मंदिर प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मुख्य मंदिराला सजावट करण्यात आली असून पालखी रथ प्रवेशद्वारापाशी ठेवण्यात आला आहे, त्याला देखील फुलांची आरास करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिरात येणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने डॉग स्कॉडकडून मंदिर परिसराची पाहणी करण्यात आली आहे. यावेळी डॉग स्कॉड देखील संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात नतमस्तक झालेले पाहायला मिळाले.
हेही वाचा - PM Modi Dehu Visit : पंतप्रधानांच्या सभास्थळी जय्यत तयारी; 30 ते 40 हजार वारकरी राहणार उपस्थित