ETV Bharat / state

PM Modi Pune Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी 'दगडूशेठ' गणपती चरणी लीन; 'हा' केला संकल्प - PM Narendra Modi

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दर्शनासाठी आले होते. त्यांनी दीड तास पारंपारिक धार्मिक पद्धतीने महापूजा केली आहे. मंदिराच्या वतीने त्यांचे पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे.

PM Modi Pune Visit
मोदींनी घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन
author img

By

Published : Aug 1, 2023, 2:31 PM IST

मोदींनी घेतले दगडूशेठ गणपतीचे दर्शन

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 'दगडूशेठ' गणपती चरणी लीन झाले आहेत. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. 'भारत विश्वगुरु व्हावा' असा नरेंद्र मोदी यांनी गणपतीचरणी प्रधान संकल्प केला आहे. ढोल-ताशांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने मंदिरात झालेल्या स्वागताने आणि ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांची माहिती घेत नरेंद्र मोदी प्रभावित झाले.

नरेंद्र मोदी यांचा सन्मान : महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस हेमंत रासने उपस्थित होते. ट्रस्टतर्फे दोन किलो वजनाची चांदीची गणरायाची मूर्ती, महावस्त्र, फळांची परडी व सुकामेवा देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान करण्यात आला. पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे पराग गाडगीळ, सौरभ गाडगीळ यांनी ही मूर्ती साकारली होती.

मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने स्वागत : मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर भव्य कमानी व मंडप घालून मोदी यांचे स्वागत करण्यात आले. तसेच मंदिराला फुलांची आकर्षक सजावट देखील करण्यात आली. स्वरूपवर्धिनी ढोल-ताशा पथकाच्या वादनाने आणि ममता सकपाळ यांसह सुवासिनींनी औक्षण करून मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. मंदिरामध्ये सभामंडपात धार्मिक विधींतर्गत 'भारत विश्वगुरु व्हावा' याकरिता मोदी यांनी महाभिषेकात संकल्प केला. याशिवाय पंचोपचार पूजा व महाआरती देखील झाली. वेदमूर्ती मिलिंद राहुरकर गुरुजी यांनी पौरोहित्य केले. मंदिराच्या संरक्षक भिंतीवर आतल्या बाजूने लावण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमाच्या फलकांची पाहणी करीत त्यांनी विश्वस्तांकडून माहिती घेतली.

सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी : सहा ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर भाविकांसाठी बंद करण्यात आले होते. सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर प्रशासनाने आज विशेष खबरदारी घेतलेली. सकाळपासूनच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त आहे.

हेही वाचा :

  1. PM Modi Pune Visit: शिवरायांनी शाहिस्तेखानचा लाल महालात केलेला हल्ला हा देशातील पहिला सर्जिकल स्ट्राईक -शरद पवार
  2. PM Modi Pune Visit: पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर, 'असे' आहे दिवसभरातील वेळापत्रक
  3. PM Modi Pune Visit : पंतप्रधान मोदी आज पुणे दौऱ्यावर; मेट्रोला दाखवणार हिरवा झेंडा, जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.