पुणे - शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसीमधील सरदवाडी येथे आज(4 जानेवारी) दुपारी प्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत.
हेही वाचा - चाकण एमआयडीसीमधील पुठ्ठ्यांच्या कारखान्याला भीषण आग, ८ तासानंतर आग आटोक्यात
आगीमुळे परिसरात सर्वत्र धुराचे लोट पसरले आहेत. प्लास्टिक गोडाऊनच्या आजूबाजूला घरे आहेत. त्यामुळे, आर्थिक नुकसान होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. आगीची तीव्रता जास्त असल्याने नियंत्रण मिळवणे अवघड होत आहे. स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.