ETV Bharat / state

'सर्जन असो की सर्जन जनरल, बायकोचं तर ऐकावचं लागत'

author img

By

Published : Dec 23, 2019, 4:35 AM IST

Updated : Dec 23, 2019, 7:24 AM IST

बायकोचे ऐकावच लागते. मग तो सर्जन असो की सर्जन जनरल, असे व्यक्तव्य नियोजित लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरून सभागृहात एकच हशा पिकला.

नियोजित लष्करप्रमुख मनोज नरवणे
नियोजित लष्करप्रमुख मनोज नरवणे

पुणे - सकाळी मी बायकोशी बोलत होतो. तिला मी आज शाळेत कार्यक्रम असून माझा सत्कार होणार असल्याचे सांगितले. तसेच भाषण द्यावे लागणार असेही सांगितले. त्यावर ती म्हणाली, तू काय पण कर मराठीत मात्र नको बोलू. मग काय बायकोचे ऐकावच लागते. मग तो सर्जन असो की सर्जन जनरल, असे व्यक्तव्य नियोजित लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरून सभागृहात एकच हशा पिकला.

बोलताना नियोजित लष्करप्रमुख मनोज नरवणे

देशाचे नियोजित लष्कर प्रमुख मनोज नरवणे रविवारी (दि. 22 डिसें) पुण्यातील एका कार्यक्रमात हजर होते. नरवणे हे ज्ञानप्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. लष्करप्रमुखपदी निवड झाल्याने ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने आज न्यु इंग्लिश स्कुल शाळेच्या मैदानावर त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर सत्काराला उत्तर देताना नरवणे म्हणाले, ज्या क्षेत्राची तुम्हाला आवड आहे त्याच क्षेत्रात काम करा, हे आम्हाला शाळेने शिकविले. माझे आजचे यश हे प्रशालेने आमच्या जडणघडणीसाठी केलेल्या सांघिक प्रत्यत्नांचे यश आहे.

हेही वाचा - पुणे-नाशिक महामार्गावर अवैध गुटखा वाहतूक; ट्रकसह गुटखा जप्त

आपले उर्वरित भाषण त्यांनी इंग्रजी भाषेत केले. त्यावेळी नरवणे म्हणाले, अभियांत्रिकी ड्राईंग हा माझा आवडता विषय. त्यामुळे आयुष्यात कोणत्याही अडचणीकडे 3 बाजुंनी पाहण्याची सवय शालेय जीवनापासूनच लागली. सैन्यदलात काम करत असतानाही त्याचा खुप उपयोग झाला. आज जे काही यश संपादन करु शकलो त्यावर शालेय शिक्षणाचा भर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हेहा वाचा - 'शेतकऱ्यांप्रमाणे मागासवर्गीय महामंडळांचीही कर्ज माफ करा'

Intro:सर्जन असो की सर्जन जनरल, बायकोचं तर ऐकावचं लागतं' - नियोजित लष्करप्रमुख मनोज नरवणे

देशाचे नियोजित लष्कर प्रमुख मनोज नरवणे आज पुण्यातील एका कार्यक्रमात हजर होते. नरवणे हे ज्ञानप्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. लष्करप्रमुखपदी निवड झाल्याने ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने आज न्यु इंग्लिश स्कुल शाळेच्या मैदानावर त्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर सत्काराला उत्तर देताना नरवणे म्हणाले, ज्या विषयाची तुम्हाला आवड आहे त्याच विषयात काम करा हे आम्हाला शाळेने शिकविले. माझे आजचे यश हे प्रशालेने आमच्या जडणघडणीसाठी केलेल्या सांघिक प्रत्यत्नांचे यश आहे.

तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरवातीला बोलताना ते म्हणाले, "आज सकाळी मी बायकोशी बोलत होतो. तिला मी आज शाळेत कार्यक्रम असून माझा सत्कार होणार असल्याचे सांगितले. तसेच भाषण द्यावं लागणार असेही सांगितले. त्यावर ती म्हणाली तू काय पण कर पण मराठीत नको बोलू..मग काय बायकोचं तर ऐकावचं लागतं..मग तो सर्जन असो की सर्जन जनरल" त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात एकच हशा पिकला. त्यानंतर उर्वरित भाषण त्यांनी इंग्रजीतच संपविले.

आपल्या उर्वरित भाषणात बोलताना नरवणे म्हणाले, अभियांत्रिकी ड्राईंग हा माझा आवडता विषय. त्यामुळे आयुष्यात कोणत्याही अडचणीकडे तीन बाजुंनी पाहण्याची सवय शालेय जीवनापासूनच लागली. सैन्यदलात काम करत असतानाही त्याचा खुप उपयोग झाला. आज जे काही यश संपादन करु शकलो त्यावर शालेय शिक्षणाचा भर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. Body:।।Conclusion:।।
Last Updated : Dec 23, 2019, 7:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.