ETV Bharat / state

वन ‘वणवा’ नियंत्रित जनजागृतीसाठी पुणे जिल्हा नियोजन समितीचा पथदर्शी प्रकल्प - पुणे जिल्हा नियोजन समिती प्रकल्प

पुणे जिल्हा नियोजन समितीने (Pune District Planning Committee) पर्यावरण तज्ज्ञांच्या मदतीने बारामती, पुरंदर, भोर, वेल्हेसाठी वन ‘वणवा’ नियंत्रित जनजागृतीसाठी पथदर्शी प्रकल्प (Vanava controlled public awareness) हाती घेतला आहे.

vanva
पुणे जिल्हा वणवा जनजागृती प्रकल्प
author img

By

Published : Mar 15, 2022, 8:53 PM IST

Updated : Mar 15, 2022, 9:19 PM IST

बारामती - जागतिक तापमान वाढ आणि मानवी कारणांमुळे अनेकदा जंगलच्याजंगल आगीच्या भक्ष्यस्थानी कायम पडत असल्याच्या घटना घडत आहेत. परिणामी स्थानिक जैवविविधता नष्ट होत आहे, याबाबत स्थानिक लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे आवश्यक बनले आहे. यासाठी पुणे जिल्हा नियोजन समितीने (Pune District Planning Committee) पर्यावरण तज्ज्ञांच्या मदतीने बारामती, पुरंदर, भोर, वेल्हेसाठी वन ‘वणवा’ नियंत्रित जनजागृतीसाठी पथदर्शी प्रकल्प (Vanava controlled public awareness) हाती घेतला आहे.

राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अनेकदा मुद्दामहून जंगलांना आगी लावल्या जातात. या आगी लावून शेतीसाठी जमीन मिळवली जाते किंवा शिकारीसाठी जमीन तयार केली जाते. लाकडाच्या वापरासाठीही जंगलाला आग लावल्या जातात, त्यामुळे वनराई जळून बेचिराख होते. अगोदरच ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळला असून पर्यावरणीय स्थिती अधिकच बिकट होत चालली आहे. अशी शंका पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

सौजन्य - पुणे जिल्हा माहिती कार्यालय

उन्हाळ्यात जंगलात लागणाऱ्या आगीच्या घटना नेहमीच वाढत असतात. वळवाच्या पावसातून जनावरांना चांगला चारा मिळेल या आशेने काही जण जंगलात आग लावतात. जंगल परिसरात देखरेख ठेवणाऱ्या यंत्रणेच्या कुचराईतून आगीची व्याप्ती दिवसेदिवस वाढत असल्याचे समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्याला आग लागून त्यात शेकडो हेक्टर जंगल नष्ट झाले होते. तेव्हा हा प्रश्न कारवाई पुरताही मर्यादित नसून, त्यासाठी अभ्यासपूर्ण उपाययोजनांची गरज असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निर्देशानुसार स्थानिक जैवविविधतेबाबत लोकांमध्ये जनजागृती करणे, वणवा नियंत्रण करणे या मुख्य उद्देशाने जिल्हा नियोजन समितीने बारामती, पुरंदर, भोर, वेल्हे या चार तालुक्यासाठी ‘वणवा नियंत्रित’ पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे.

या प्रकल्पामुळे भविष्यात वणवा रोखण्यासाठी स्थानिकांचा सहभाग वाढणार आहे. हा प्रकल्प बारामती, पुरंदर, वेल्हे, भोर या चार तालुक्यामधील १०० वणवा लागणाऱ्या गावात राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी किरण मोघे यांनी सांगितले.

वणवा पेटण्याचे नैसर्गिक कारणे -

आकाशातून पडणारी वीज.

उन्हाळ्यांतील उष्ण्तेने कोरडी पाने व गवत पेटल्याने.

मोठी झाडे पडताना झालेल्या घर्षणामुळे.

गवत व पाने कुजताना झालेल्या मिथेनसारख्या ज्वलनशील वायूमुळे.या व्यतिरिक्त, वैयक्तिक हितासाठीपण जंगलात वणवे पेटविले जातात.

वन वणव्यांचे दुष्परिणाम -

· जैवविविधतेचे प्रचंड नुकसान होते.
· अनेक वन्यजीवांच्या जाती नष्ट होतात.
· मातीची धूप, भूजल पातळीत घट, माती व पाणी वाहण्याचा वेग अमर्यादित होतो.
· तापमान वाढ, हवामान बदल, प्रदूषणात वाढ.

दृष्टीक्षेपातील प्रकल्प

· स्थानिक जैवविविधताबाबत लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे
· वणव्याचे दुष्परिणाम विषयक जनजागृती करणे.
· वन्य प्राणी आणि मानव संघर्ष रोखणे.
· स्थानिक वृक्षसंपदा जोपासणेसाठी जनजागृती करणे.
· जलसंधारण आणि वनवे यांचे महत्व पटवून देणे.
· वन समित्यामध्ये जनजागृती निर्माण करणे.
· स्थानिक गवताळ अधिवासाचे संरक्षण करणे.
· ओढे वाचविणे विषयक जागृती करणे.
· शालेय पर्यावरण शिक्षण प्रकल्प.
· वन व पर्यावरण समित्या, शालेय व लोकासाठी विविध फिल्म्स, स्लीईड शो, व्याखाने, निसर्ग सहली, कृतीशील प्रयोग.
· वनवे व निसर्ग विषयक माहितीचा चित्र रथ तयार करून वर्षभर जनजागृती करणे.

असा असेल प्रकल्प कार्यक्रम -

· चित्ररथ हा आठवडे बाजारातून प्रत्येक गावी जनजागृतीसाठी फिरवणे.
· ग्रामपंचायतीच्या मदतीने स्थानिक वने, वणवे, पक्षी, मधमाश्या, स्थानिक वृक्ष चळवळ, शेती व पर्यावरण, आपली जैवविविधता अशी व्याखाने आयोजित करण्यात येईल.
· शालेय स्तरावर सहलीचे आयोजन वर्षभर करणे, यामध्ये स्थानिक जैवविविधता, निसर्ग सहल, पक्षी निरीक्षण, पर्यावरणपूरक सण, आपली वृक्षसंपदा, आपले मित्र मुंग्या-मधमाश्या-वटवाघळ महत्व सांगणे.
· स्थानिक जैवविविधता, मधमाश्या, ओढे, बाभूळ, उंबर, मुंग्या, साप, पक्षी आणि शेती अश्या दैनंदिन जीवनाशी जोडलेल्या घटकावर शॉर्ट फिल्म तयार करण्यात येणार आहे.

या प्रकल्पामुळे असा होईल फायदा...

· जैवविविधता सुरक्षित होऊन वाढेल.
· वन्यजीव वाढतील. तसेच वनवे नियंत्रित करण्यासाठी स्थानिक लोक पुढे येतील.
· परदेशी वृक्ष लागवडीला आळा बसेल.
· ओढे, स्थानिक झाडे, माळराने यांचे संरक्षण होईल.
· जलसंधारणाचे मुळ हे गवताच्या मुळात आहे हे पटेल.
· शेतकरी आणि वन्यजीव संघर्ष कमी होईल.
· शालेय मुलांचा व आधुनिक शेतकरी यांचा पर्यावरणीय बुद्ध्यांक वाढेल.
· शेतीच्या बांधावर, घराशेजारी, शालेय परिसरात, उद्याने यात कोणती झाडे लावावित याचा मोठा प्रसार करण्यात येईल त्यामुळे मोठ्या प्रमाणात निसर्ग संवर्धन होईल.

वनवा नियंत्रण ही काळाची गरज आहे. भविष्यात आपल्याला जैव विविधता पूरक जगायचे असेल तर जंगलाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. वनवा लागल्यास स्थानिक लोकांनी तात्काळ विझविण्याचा तसेच वनवा लागणार नाही यासाठी प्रयत्न केले पाहिजे. अशी माहिती पर्यावरणतज्ञ डॉ. महेश गायकवाड यांनी दिली.

Last Updated : Mar 15, 2022, 9:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.