ETV Bharat / state

Pimpri Fire: अगरबत्ती बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग; विद्यार्थ्यांना काढले बाहेर, आकुर्डीमधील घटना

author img

By

Published : Dec 6, 2022, 4:25 PM IST

Pimpri Fire: गीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन विभाग करत आहेत. अद्याप आग कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही. पिंपरी- चिंचवड शहरातील आकुर्डी येथे असलेल्या अगरबत्ती बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली.

Pimpri Fire
Pimpri Fire

पुणे: पिंपरी- चिंचवड शहरातील आकुर्डी येथे अगरबत्ती बनविणाऱ्या रॉयल फ्रॉग्णसेस कारखान्याला भीषण आग लागली आहे. कारखान्याच्या शेजारी असलेल्या बिना इंग्लिश मीडियम स्कूलमधील दोनशे विद्यार्थ्यांना खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. आज सकाळी साडेदहाच्या सुमारास आगीची घटना घडली आहे.

अगरबत्ती बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग

भीषण आग लागली: आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन विभाग करत आहेत. अद्याप आग कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही. पिंपरी- चिंचवड शहरातील आकुर्डी येथे असलेल्या अगरबत्ती बनविणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. कारखान्याच्या शेजारीच असलेल्या इंग्लिश मीडियम स्कूल मधील दोनशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना खबरदारी चा उपाय म्हणून स्थलांतरित करण्यात आलं.

निगडी पोलीस घटनास्थळी दाखल: कारखान्यात काही कामगार करत होते. तेव्हा, कारखान्यात आग लागली. सुदैवाने कामगार सुखरूप बाहेर पडले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न अग्निशमन विभाग करत आहे. निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अजून ही आग धुमसत आहे. अशी माहिती निगडी पोलिसांनी दिली आहे. आगीमध्ये कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.