पुणे - पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरात नागरिकांच्या मारहाणीत चोरट्याच्या मृत्यू झाला नसून हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. ही माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.
मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोराचा मृत्यू नागरिकांच्या मारहाणीत झाल्याचे अवघ्या शहरात झाले होते. मात्र, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सर्व काही स्पष्ट होईल, असे भोसरी पोलिसांनी सांगितले होते.
संतोष महादू हौसे (वय- 38 रा.दिघी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो नेहमी नशेमध्ये असायचा असे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, मंगळवारी पहाटेच्या सुमारास एका घरात जाऊन त्याने कपाट उचकटले होते, असे पोलिसांच्या निदर्शनास आले असून तो चोरीच्या उद्देशाने गेल्याच पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटेच्या सुमारास भोसरी परिसरात एका चोरट्याच्या मृत्यू नागरिकांच्या मारहाणीत झाल्याची बातमी अवघ्या शहरभर पसरली. दरम्यान, भोसरी पोलिसांनी संयम बाळगत शवविच्छेदन अहवालात सर्व काही स्पष्ट होईल असे सांगितले होते. त्यानुसार त्याचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाला असल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. संतोष हा भोसरी येथील एका घरात शिरला त्याने त्याचा चोरी करण्याचा उद्देश होता. दरम्यान, याची चाहूल घरातील व्यक्तींना लागली. त्यांनी संतोषला पकडून बांधून ठेवले. या घटनेमुळे तो घाबरून गेला आणि हृदय विकाराच्या झटक्याने त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला आहे, असे शवविच्छेदन अहवालात समोर आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिली आहे.