ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये 'गटारी'निमित्त रस्त्यांवर गर्दी.. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा - social distance news pimpri chinchwad news

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात येत आहे. त्याची कडक अंमलबजावणी देखील शहरात होताना दिसत आहे. संचारबंदीच्या काळात नागरिक घराबाहेर पडले नाहीत. म्हणावे तसे सहकार्य पोलिसांना नागरिकांनी केले. परंतु, आज गटारीनिमित्त नागरिकांना सूट दिली आणि रस्त्यांवर नागरिकांनी गर्दी पाहायला मिळाली. यामुळे अक्षरशः सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे.

सोशल डिस्टसिंगचा फज्जा
सोशल डिस्टसिंगचा फज्जा
author img

By

Published : Jul 19, 2020, 9:42 PM IST

पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये पाच दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर आजपासून नियमांमध्ये शिथिलता महानगरपालिका प्रशासनाने दिली होती. रविवारी सूट देत सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तू तसेच मटण, चिकनची दुकाने सुरू करण्यास मुभा दिली. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात नागरिकांनी फज्जा उडवला आहे. भाजी मंडई तसेच किराणा दुकानात गर्दी पाहायला मिळाली.

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या पाच दिवसांपासून लॉकडाऊन लागू असून आणखी पाच दिवस लॉकडाऊन असणार आहे. परंतु, उद्या सोमवारपासून लॉकडाऊनच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला असून सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत जीवनावश्यक दुकानांसह इतर दुकाने खुली राहणार आहेत. मात्र, आज महानगरपालिका प्रशासनाने विशेष सूट देत सकाळपासून सायंकाळपर्यंत जीवनावश्यक दुकानांसह, भाजीपाला विक्री, मंडई, यांच्यासह चिकन आणि मटनांची दुकाने खुली होती. मात्र, गेल्या पाच दिवसांपासून घरात असलेल्या नागरिकांनी एकच गर्दी करत सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी केली आहे.

एकीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात येत आहे. त्याची कडक अंमलबजावणी देखील शहरात होताना दिसत आहे. संचारबंदीच्या काळात नागरिक घराबाहेर पडले नाहीत. म्हणावे तसे सहकार्य पोलिसांना नागरिकांनी केले. परंतु, आज गटारीनिमित्त नागरिकांना सूट दिली आणि रस्त्यांवर नागरिकांनी गर्दी पाहायला मिळाली. यामुळे अक्षरशः सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे नागरिकांनीदेखील विचार करण्याची गरज असून कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.