ETV Bharat / state

कोरोना लॉकडाऊन : पिंपरी-चिंचवडमध्ये विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या 74 नागरिकांवर गुन्हे दाखल - police take action against citizen

पिंपरी-चिंचवड शहरात संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, अनेकजण वेगवेगळी कारणे देत घराबाहेर पडत आहेत.

Pimpri Chinchwad lockdown
पिंपरी चिंचवड संचारबंदी
author img

By

Published : Mar 27, 2020, 9:00 AM IST

पुणे - पिंपरी-चिंचवडमध्ये विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या 74 नागरिकांवर जमावबंदी आणि संचार बंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातून ही माहिती देण्यात आली असल्याचे अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले. तसेच हा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींना एक वर्षाचा कारावास किंवा एक हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, अशी माहिती पोकळे यांनी दिली.

पिंपरी-चिंचवडमध्ये विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या 74 नागरिकांवर गुन्हे दाखल

हेही वाचा... ११ हजार आरोपींची सुटका पॅरोलवर करण्याचे गृहमंत्र्यांचे आदेश

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. पिंपरी-चिंचवड शहरात संचारबंदी आणि जमावबंदीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, अनेकजण वेगवेगळी कारणे देत घराबाहेर पडत आहेत. तेव्हा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घराबाहेर पडणाऱ्या एकून ७४ जणांवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कारवाई केली आहे.

हेही वाचा... लॉक डाऊनचा असाही इफेक्ट! तळीरामांनी दारूसाठी चक्क दारूची दुकाने फोडली

ज्या व्यक्तींवर हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांना किमान एक वर्षांपर्यंतचा कारावास किंवा एक हजार रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. असेही अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी सांगितले. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले।

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.