ETV Bharat / state

Krishna Prakash Transferred : 'कृष्ण प्रकाश' यांची उचलबांगडी; 'हे' असतील नवे पोलीस आयुक्त

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची उचलबांगडी करण्यात आली ( Pimpri Chinchwad CP Krishna Prakash transferred ) आहे. अंकुश शिंदे हे पिंपरी-चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त असणार ( Ankush Shinde New CP Pimpri Chinchwad ) आहेत.

Krishna Prakash
Krishna Prakash
author img

By

Published : Apr 21, 2022, 6:57 PM IST

पिंपरी चिंचवड - पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची उचलबांगडी करण्यात आली ( Pimpri Chinchwad CP Krishna Prakash transferred ) आहे. त्यांना पोलीस महानिरीक्षक व्ही.आय.पी येथे नियुक्त करण्यात आले आहे. अंकुश शिंदे हे पिंपरी-चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त असणार ( Ankush Shinde New CP Pimpri Chinchwad ) आहेत. कृष्ण प्रकाश हे नेहमी प्रकाश झोतात राहण्यासाठी प्रयत्न करत. त्यामुळेच त्यांचे हे प्रकाश झोतात राहणे भोवल्याची चर्चा पोलीस आयुक्तालयात आहे. 2 सप्टेंबर 2020 रोजी कृष्ण प्रकाश यांनी पिंपरी पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता. त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याअगोदरच त्यांची उचलबांगडी करण्यात आलीय.

मावळते पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची पिंपरी-चिंचवडमधील कारकीर्द काहीशी वादात तर चर्चेची ठरली. पोलीस आयुक्तांनी गुन्हेगारी मुक्त करणार असल्याचा विडाच उचलला होता. परंतू, गुन्हेगारी कमी करण्यात पोलीस आयुक्तांना यश आले नाही. कृष्ण प्रकाश यांनी वेषांतर करुन पहिल्यांदा पोलीस कर्मचारी नागरिकांना कशा प्रकारे वागणूक देतात हे पाहण्यासाठी ठाण्यांना भेट दिली होती. तेव्हा त्यांचे महाराष्ट्रभर कौतुकास्पद चर्चा झाली.

तर, चाकण येथे किरकोळ गुंडाना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस आयुक्तांवर गोळीबार झाला होता. तेव्हा झाड फेकून तीन जणांना आडव केले होते. या कारवाईमुळे त्यांच्यावर टीका तर झालीच, पण संशयाच्या भोवऱ्यात अडकले होते. शिवाय, खंडणी मागणाऱ्या आरोपीला हॉटेलमध्ये फिल्मीस्टाईल पकडून मिशिवर ताव मारणाऱ्या कृष्ण प्रकाश यांची तेव्हा देखील चर्चा रंगली होती. कृष्ण प्रकाश यांचा नेहमी प्रकाश झोतात राहण्यासाठी आटापिटा होता. तोच त्यांना भोवल्याची चर्चा होतेय.

कोणत्याच आयुक्तांनी कार्यकाळ पूर्ण केला नाही - पिंपरी-चिंचवडचे पहिले पोलीस आयुक्त आर.के.पदमनाभन, संदीप बिष्णोई आणि आता कृष्ण प्रकाश यांचा कार्यकाळ होण्याआधीच बदली करण्यात आली. एक प्रकारे ही उचलबांगडीच केल्याचे सांगण्यात येत आहे. कृष्ण प्रकाश यांची कारकीर्द वादाची तितकीच प्रसिद्धीमय होती, असे म्हणायला हरकत नाही.

हेही वाचा - Devendra Fadnavis : पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्यावर फडणवीसांना संशय म्हणाले, 'वसुलीचा..'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.