ETV Bharat / state

पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी ४८ जणांवर गुन्हा दाखल; काही जण ताब्यात - आनंदनगर दगडफेक प्रकरण

पिंपरी-चिंचवडच्या आनंदनगर परिसरात सोमवारी पोलीस आणि नागरिक समोरासमोर आले होते. यामध्ये पोलीस गर्दी पांगवण्याचा प्रयत्न करत असताना जमावाने त्यांच्यावर दगडफेक केली. याप्रकरणी ४८ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून काहींना ताब्यात घेण्यात आले आहे.

stone pelting in anand nagar
पोलिसांवर दगडफेक केल्या प्रकरणी ४८ जणांवर गुन्हा दाखल
author img

By

Published : Jun 9, 2020, 2:15 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - आनंदनगर परिसरातील नागरिकांनी सोमवारी पोलिसांवर दगडफेक केली होती. याप्रकरणी ४८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आनंदनगर परिसर हा कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केलेला आहे. मात्र, तेथील नियम शिथिल करण्याच्या मागणीसाठी शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले होते. पोलिसांनी प्रकरण शमवण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक पोलिसांवर दगडफेक करण्यात आली यात काही पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस मोठ्या संख्येने वाढत आहे. गंभीर बाब म्हणजे चिंचवड येथील आनंदनगर झोपडपट्टीमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित आढळले असून तो परिसर सील करण्यात आला आहे. परंतु, परिसरातील नियम शिथिल करण्याच्या मागणीसाठी शेकडो नागरिक रस्त्यावर आले होते. त्यावेळी पोलीस प्रशासन आणि नागरिक समोरासमोर आले. पोलिसांनी नागरिकांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, गर्दीने अचानक पोलिसांच्या दिशेने दगड भिरकावले. यात पोलिसांच्या वाहनांचे नुकसान झाले असून काही जण जखमी झाले आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या आनंदनगरात पोलिसांवर दगडफेक केल्या प्रकरणी ४८ जणांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी ४८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच काही जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांची नावे - देवनुल, विशाल, मोरे, लक्ष्मण, ठोकळ, संदीप वर्मा, विकास जाधव, रमेश साबळे, करण बोरुले, धन्या खंडागळे, बाळया, मुसा, बाब्या, विशाल भोसले, मल्हारी कांबळे, धीरज म्हस्के, महादेव सरोदे, शिला कांबळे, कलावती सोनटक्के, रेश्मा कांबळे, रोहन आसोदे, राहुल चलवादी, रोहीत गोंदणे, तेजस गोपरेडडी, तसेच इतर २५ महिला व पुरुषांचा समावेश आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.