ETV Bharat / state

पिंपरीतील चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडेंचा विजय - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना एकूण ८६ हजार ९८५ मते मिळाली तर शिवसेनेचे उमेदवार चाबुकस्वार यांना ६७ हजार १७७ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण उर्फ बाळासाहेब गायकवाड यांना १३ हजार ६८१ मते मिळाली

अण्णा बनसोडेंचा विजय
author img

By

Published : Oct 24, 2019, 11:17 PM IST

पुणे - पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांचा १९८०८ मतांनी पराभव करीत गेल्या विधानसभेतील पराभवाचा वचपा काढला आहे.

पिंपरी विधानसभा मतदार संघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्याशी होती. या दोघांसह एकूण १८ उमेदवार रिंगणात होते. परंतु मुख्य लढत चाबुकस्वार व बनसोडे यांच्यातच होती. मतमोजणीच्या एकूण २० फेर्‍या झाल्या. पहिल्या सहा फेरीअखेर गौतम चाबुकस्वार आघाडीवर होते. मात्र, सातव्या फेरीपासून अण्णा बनसोडे यांनी आघाडी घेतली. शेवटच्या फेरीपर्यंत आघाडी टिकवून ठेवत बनसोडे यांनी गौतम चाबुकस्वार यांचा पराभव केला.

अण्णा बनसोडेंचा विजय

राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना एकूण ८६ हजार ९८५ मते मिळाली तर शिवसेनेचे उमेदवार चाबुकस्वार यांना ६७ हजार १७७ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण उर्फ बाळासाहेब गायकवाड यांना १३ हजार ६८१ मते मिळाली. या मतदारसंघात ३२४६ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला. पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेचे एकमेव आमदार चाबुकस्वार यांचा पराभव झाल्याने हा पराभव शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Intro:mh_pun_04_pimpari_ncp_win_avb_mhc10002Body:mh_pun_04_pimpari_ncp_win_avb_mhc10002

Anchor:- पिंपरी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांचा १९८०८ मतांनी पराभव करीत गेल्या विधानसभेतील पराभवाचा वचपा काढला आहे.

पिंपरी विधानसभा मतदार संघात भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांची लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी आमदार अण्णा बनसोडे यांच्याशी होती. या दोघांसह एकूण १८ उमेदवार रिंगणात होते. परंतु मुख्य लढत चाबुकस्वार व बनसोडे यांच्यातच होती. मतमोजणी एकूण २० फेर्‍या झाल्या. पहिल्या सहा फेरीअखेर गौतम चाबुकस्वार आघाडीवर होते. मात्र, सातव्या फेरीपासून अण्णा बनसोडे यांनी जादुई आघाडी घेतली. शेवटच्या फेरीपर्यंत आघाडी टिकवून ठेवत बनसोडे यांनी गौतम चाबुकस्वार यांचा पराभव केला.

राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना एकूण ८६ हजार ९८५ मते मिळाली तर शिवसेनेचे उमेदवार चाबुकस्वार यांना ६७ हजार १७७ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रवीण उर्फ बाळासाहेब गायकवाड यांना १३ हजार ६८१ मते मिळाली. या मतदारसंघात ३२४६ मतदारांनी नोटाचा उपयोग केला.पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेनेचे एकमेव आमदार चाबुकस्वार यांचा पराभव झाल्याने हा पराभव शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.