पिंपरी-चिंचवड (पुणे) - महाराष्ट्र राज्यासह पिंपरी-चिंचवड शहरात आज सशर्त केसकर्तनालय खुली करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक दुकाने दुकान मालकांनी उघडली आहेत. परंतु, आज रविवार असून देखील ग्राहक नसल्याचे दुकान मालक चिंतेत आहेत.
कोरोनामुळे नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. त्यात, हेअर कट करण्यास आलेला प्रत्येक ग्राहक दाढी करण्यास सांगत आहे. त्यामुळे राज्य सरकारने लवकरात-लवकर दाढी करु देण्यासंदर्भातील निर्णय लवकर घ्यावा, अशी मागणी केशकर्तनालय चालक, मालक करत आहे. या विषयी आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण पांचाळ यांनी सलून मालक विशाल अहिरे यांच्याशी साधलेला संवाद.