आळंदी (पुणे) - खेड तालुक्यात महिलेला खोलीवर बोलवून जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेनं आळंदी पोलीस ठाण्यात रविवारी फिर्याद दिली आहे. मन्नु धिरेंद्र मलिक असे आरोपीचे नाव असून याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
जीवे मारण्याची धमकी
आरोपीने पीडितेला पाणी घेऊन रुममध्ये बोलवले. पीडिता पाणी घेऊन रुममध्ये आल्यावर आरोपीने दार बंद करून पीडितेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच, याबाबत कुणाला सांगितले तर तुला व तुझ्या आई वडिलांना जीवे मारून टाकीन, अशी धमकीही दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.