पुणे - पतीच्या संमतीनेच एकाने पत्नीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 25 वर्षीय विवाहितेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यात पती आणि अन्य एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. कात्रज परिसरातील एका वसतिगृहात नोव्हेंबर २०१९ मध्ये ही घटना घडली असून महिलेने तक्रार दिल्याने आता हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सुरेश शैशराज शिंदे (वय - 34) याला पोलिसांनी अटक केली.
तक्रारदार महिला कामानिमित्त कात्रज परिसरातील एका वसतिगृहात पतीसोबत राहत होती. याच वसतिगृहात काम करणाऱ्या आरोपी सुरेश शिंदे याने त्या महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तिने हा प्रकार पतीला सांगितला असता त्याने मीच त्याला तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास सांगितले होते, असे धक्कादायक उत्तर दिले. त्याचे हे उत्तर ऐकून या महिलेला धक्का बसला. यानंतर तक्रादार महिलेने नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी पती आणि आरोपी सुरेश शिंदे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.
हेही वाचा - गडचिरोली सामूहिक आत्महत्या: अपराधीपणाच्या भावनेतून 'त्या' दाम्पत्याचाही आत्महत्येचा प्रयत्न