पुणे - राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून कोरोनावर उपाययोजना करण्यात येत आहेत. याचसोबत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले.
यानंतर आज मंचरमध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील प्रत्येक घरावर निर्जंतुकिकरणासाठी फवारणी करण्यात येत आहे. यामध्ये स्वत: सरपंच दत्ता गांजळे आणि उपसरपंच अग्रभागी आहेत. यांसोबतच आजी-माजी ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्यांनी हातात पाईप घेऊन संपूर्ण परिसरात फवारणी केली. कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता गर्दी टाळण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. यानंतर अनेक कार्यक्रम नागरिकांनी रद्द करण्यात आले. यानंतर आता नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सरपंचांनी हातात फवारणी यंत्र घेतले.
दरम्यान, शाळा महाविद्यालयांसह कामगारांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्याने नागरिकांनी घराबाहेर न पडला परिसर व घर स्वच्छ ठेवून काळजी घेण्याचे आवाहन सरपंच दत्ता गांजळे यांनी केले आहे.