ETV Bharat / state

आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवलेल्या ज्ञानमंदिरात शिक्षणासाठी लाखोंचा काळाबाजार?

author img

By

Published : Aug 3, 2021, 8:59 AM IST

Updated : Aug 3, 2021, 9:48 AM IST

वाबळेवाडीची शाळा देशात नावाजलेली आहे. या शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. मात्र, या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरव्यवहार होत होता. स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास टाळाटाळ केली जात होती.

wablewadi school
वाबळेवाडी शाळा

शिरुर (पुणे) - तालुक्यातील वाबळेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पाच ते पंचवीस हजार रुपये रोख स्वरूपात रक्कम शाळा सुधार निधीच्या नावाखाली घेतली जात होती. मात्र, ती रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या बँक खात्यात जमा करण्याऐवजी खासगी व्यक्तीच्या नावे जमा करत असल्याचे समोर आले आहे.

याबाबत ईटीव्ही भारत प्रतिनिधीने संबंधितांशी केलेली बातचीत

वाबळेवाडीची शाळा देशात नावाजलेली आहे. या शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. मात्र, या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरव्यवहार होत होता. स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास टाळाटाळ केली जात होती. त्यामुळे जिल्हा परिषदेकडे अनेक पालकांनी लेखी आणि तोंडी तक्रारीदेखील केल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर शिरूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विजयसिंह नलावडे यांनी याबाबत चौकशी केली. याप्रकरणी आर्थिक व्यवहारात अनियमितता समोर आली असल्याचा अहवाल दिला आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद शाळेतील प्रशासकीय अर्थिक आणि अभिलेखांच्या सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हास्तरीय पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

जगासमोर आदर्श ठेवणारी जिल्हा परिषदेची 'झिरो एनर्जी शाळा'

भारतातील पहिली आणि जगातील तिसरी झिरो एनर्जी शाळा म्हणून शिरुर तालुक्यातील वाबळेवाडी जिल्हा परिषदची शाळा आदर्श मॉडेल ठरत आहे. राज्यातील पहिली टॅबलेट शाळा होण्याचा मानही याच शाळेला मिळाला आहे. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा असे आंतरराष्ट्रीय पातळीवर नावारूपाला आलेल्या शाळेचे या नाव आहे. मॉडेल म्हणून वाटचाल करत आहे.

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर पासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेले 50 ते 60 घरांचे वाबळेवाडी छोटसे गाव आहे. या गावची लोकसंख्या चारशेच्या आसपास आहे. दोन गळक्या खोल्या,पडक्या भिंती अशी या गावची सहा वर्षापूर्वीची शाळा होती. याच शाळेत मुले शिक्षणाचे धडे गिरवत होते. शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या मदतीने ही शाळा उभा करत शाळेचा कायापालट केला. आज हीच शाळा जगातील शिक्षण क्षेत्रासाठी प्रेरणास्थान बनली.

हेही वाचा - एमपीएससी सदस्यांची यादी राज्यपालांकडे, विधानपरिषद सदस्यांसारखी ती यादी राज्यपालांनी रोखून ठेवू नये - रोहित पवार

या शाळेच्या काचेच्या खोल्या पाहून तुम्हाला कदाचित परदेशातल्या एखादे हॉटेल आहे असे वाटते. मात्र, प्रत्यक्षात ही पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर जवळच्या वाबळेवाडी येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा आहे. ही देखणी वास्तू साकारण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हींग आणि बँक ऑफ न्यूयॉर्कची मोलाची मदत झाली आहे. ही शाळा राज्यातीलच नव्हे तर देशातील पहिली झिरो एनर्जी शाळा ठरली आहे.

जिल्हा परिषदेच्या या शाळेच्या वर्गखोल्या पूर्णतः काचेचे असून 22 फूट रुंद, 22 फूट लांब आणि 24 फूट उंच आहे. या सर्व खोल्या पर्यावरणपूरक आहेत. या वर्ग खोल्यांमध्ये प्रकाशाचे विस्तारीकरण होत आणि हवाही खेळती राहते. शिवाय झिरो एनर्जी खोलीला देखभाल आणि दुरुस्तीची गरज लागत नाही. या ठिकाणी विद्यार्थी नुसते शिकतच नाही तर अभ्यासाबरोबर मुलांच्या सर्वांगीण विकासावरही येथे भर दिला जातो, असे येथील चित्र होते. मात्र, स्थानिक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास टाळाटाळ केली जात होती. अशी तक्रार पालकांनी जिल्हा परिषदेकडे लेखी आणि तोंडी स्वरुपात दिल्या. यानंतर शिरूर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी विजयसिंह नलावडे यांनी याबाबत चौकशी केली. याप्रकरणी आर्थिक व्यवहारात अनियमितता समोर आली असल्याचा अहवाल दिला आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद शाळेतील प्रशासकीय अर्थिक आणि अभिलेखांच्या सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हास्तरीय पाच सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

हेही वाचा - 12th Result : बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार, 'या' वेबसाईट्सवर बघा तुमचा निकाल

Last Updated : Aug 3, 2021, 9:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.